Mumbai Trees : मुंबईतील झाडांची वेदनांमधून अखेर झाली मुक्ती

  26

मुंबई : मुंबईत महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करून महिलांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी महापालिकेच्या दोन महिलांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या उद्यान विभागातील दोन उद्यान विद्या सहायकांनी चक्क झाडांना वेदनांमधून मुक्त केले. बोरीवलीतील चंदावरकर मार्गावरील तब्बल ५०हून अधिक वृक्षांना ठोकलेले खिळे काढून या उद्यान विद्या सहायकांनी या वृक्षांना कायमच्याच वेदनांमधून मुक्त केले असून या दिवसापासून हाती घेतलेली ही मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागातील महिलांच्या वतीने महिला दिनाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे महिला दिनानिमित्त महिला दिनाचे कार्यक्रम आयोजित केले जात असताना महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या उद्यान विभागातील पुनम पास्टे, सुप्रिया सावंत या दोन्ही उद्यान विद्या सहायकांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. यासाठी या महिला अधिकाऱ्यांनी बोरिवली पश्चिम येथील चंदावरकर मार्गावरील तब्बल ५० हून अधिक झाडांना ठोकलेले खिळे स्वत: पुढाकार घेवून काढले. त्यांनी तब्बल १५० ते २०० खिळे काढले आहेत.


या रस्त्यावरील झाडांसह इतर झाडांना फलक तथा बोर्ड लावले जातात. यासाठी खिळे मारले जातात तसेच तारा बांधण्यासाठीही खिळे ठोकले जातात; परंतु हे बोर्ड किंवा तारा काढताना खिळे मात्र तसेच ठेवले जातात. परिणामी हे खिळे गंजून झाडांना धोका पोहोचतो. त्यामुळे हे खिळे काढणे खूप आवश्यक असतात. या खिळ्यांमुळे एकप्रकारे वृक्षांना यातना होत असतात आणि हेच खिळे काढून एकप्रकारे या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी या वृक्षांना वेदनांतून मुक्ती दिली आहे.

Comments
Add Comment

Maratha Andolan : मराठा आरक्षण आंदोलन पाचव्या दिवशीही कायम, जरांगे पाटील उपोषणावर ठाम

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस

"जरांगे शब्द जपून वापरा, आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोणी…" निलेश राणेंचा थेट इशारा

जरांगे विरुद्ध वादात निलेश राणे यांचा नितेश राणेंना थेट पाठिंबा  मुंबई: मनोज जरांगे हे आझाद मैदानात मराठा

'मुंबईला वेठीस धरू नका, आझाद मैदानव्यतिरिक्त रस्ते मोकळे करा'

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी

पुण्यातील येरवडा बालग्राम जमीन भाडेपट्ट्याला मुदतवाढ

मुंबई : येरवडा येथील बालग्राम (एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेज) संस्थेला पुणे शहरात मिळालेल्या जमिनीच्या

Manoj Jarange: न्यायालयाच्या आदेशानंतर मनोज जरांगेनीही दिला आंदोलकांना दम, हुल्लडबाजी करणाऱ्यांना म्हणाले...

काही तासांत रोडवरील गाड्या मैदानात लावा, मैदानातच झोपा, त्रास होईल असं वागू नका, जरांगे यांचे आंदोलकांना

Chhagan Bhujbal: मराठा आणि कुणबी एक हा मूर्खपणा; आमच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको

ओबीसी नेत्यांसोबतच्या बैठकीत काय निर्णय झाला, छगन भुजबळांनी दिली प्रतिक्रिया मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून १०