मुंबई: होळीसाठी थंडाई हे एकदम बेस्ट ड्रिंक आहे. थंडाईचा स्वाद अतिशय भारी असतो. थंडाई केवळ स्वादिष्टच नव्हे तर सणांचा रंग अधिक वाढवतात.
बाजारात थंडाई तर सगळीकडेच मिळते मात्र तुम्ही होळीला घरात जर थंडाई बनवण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.
जर तुम्हाला बाजारासारखी थंडाई घरी बनवायची असेल तर या ५ टिप्स फॉलो करा.
थंडाईचा स्वाद कायम ठेवण्यासाठी नेहमी फुल फॅट मिल्कचा वापर करा. यामुळे हे ड्रिंक अधिक घट्ट मलाईदार बनते. यामुळे स्वाद अधिक वाढतो.
थंडाई अधिक स्वादिष्ट करण्यासाठी बदाम आणि पिस्तासारख्या नट्सच्या मिश्रणाचा वापर करा. मसाल्यांचा विचार केल्यास तुम्ही थंडाईमध्ये दालचिनी आणि वेलची टाकू शकता. यामुळे स्वाद वाढतो.
केसर हे ऑप्शनल आहे मात्र थंडाईला अधिक स्वाद देण्यासाठी तसेच त्याचा रिचनेस वाढवण्यासाठी केसरचा वापर करा. यासोबतच तुम्ही सुकलेल्या गुलाब पाकळ्यांचा वापरही करू शकता.
जर थंडाईमध्ये गुठळ्या असतील तर ते पिताना मजा येत नाही. यामुळे थंडाई तयार केल्यानंतर ती गाळून घेणे महत्त्वाचे असते. थंडाईचा टेक्श्चर स्मूद होईल.
थंडाईचा स्वाद मिळवण्यासाठी ती नेहमी थंड प्यावी. अशातच थंडाई बनवल्यानंतर ती कमीत कमी दोन तास फ्रीजमध्ये ठेवा.