Aurangzeb History : औरंगजेब, त्याचे कुटुंब लुटारू होते : रामदेव बाबा

  93

नागपूर : ‘औरंगजेब लुटारू होता, त्याचे कुटुंब लुटारू होते. भारत लुटण्यासाठी तो आणि त्याच्या खानदानाने येथे येऊन अत्याचार केले. अशी माणसे आपले आदर्श कधीच असू शकत नाहीत.’ असे रामदेव बाबा यांनी सांगितले. नागपुरात पतंजलीच्या फूड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी रविवारी रामदेव बाबा बोलत होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे आदर्श आहेत’.असे त्यांनी ठणकावून सांगतानाच, बाबर काही भारतात काही घडवायला आला नव्हता. बाबर, अकबर, औरंगजेब त्यांची मुलं या सगळ्यांनी आपल्या हजारो आया-बहिणींची बेअब्रू केली. आपल्या देशाची ओळख पुसण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असे रामदेव म्हणाले.



सध्या महाराष्ट्रात 'छावा' चित्रपटामुळे औरंगजेबावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. तसेच, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब उत्तम प्रशासक होता, असे विधान केले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर रामदेव बाबांनी आपली भूमिका स्पष्ट केली.


रामदेव बाबा यांनी पतंजली फूड पार्क आणि त्याच्या महत्त्वावरही प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, ‘या फूड पार्कची क्षमता दररोज ८०० टन आहे. यातून नैसर्गिक पद्धतीने ज्यूस तयार केला जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.’ त्यांनी पुढे सांगितले की, ‘संत्र्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाची रोपे विकसित केली जातील. विदर्भातील संत्र्यांना देश-विदेशात निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जातील."रामदेव बाबा " जय जवान, जय किसान, जय मिहान" अशा घोषणा देखील दिल्या आणि महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."असे वचनही त्यांनी दिले.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची