निलेश रेमजे 'मुंबई श्री'चा मानकरी

मुंबई : परब फिटनेसच्या निलेश रेमजेने आजवर एकही स्पर्धा जिंकली नव्हती. गटविजेतेपद जिंकण्याचे प्रयत्न नेहमीच अपयशी ठरत होते. तरीही त्याने कधी हार मानली नाही. स्पर्धा खेळण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. अखेर गेले आठ वर्षे करत असलेली मेहनत मुंबई शरीरसौष्ठवाची खरी शान असलेल्या मुंबई श्री स्पर्धेत फळास आली आणि प्रथमच मुंबई श्रीच्या मंचावर उतरलेल्या निलेशने संधीचे सोने केले. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत बॉडी फिट जिमच्या रेखा शिंदेने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली.



मुंबई शरीरसौष्ठवाची खरी श्रीमंती ज्या स्पर्धेत मंचावर उतरते, त्या मानाच्या प्रतिष्ठेचा मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार सोहळा बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने संयुक्तपणे पुन्हा एकदा जोशपूर्ण वातावरण अंधेरीच्या लोखंडवाला गार्डनमध्ये पार पाडला. सार्‍यांनाच उत्सुकता होती ती मुंबई श्रीचा नवा विजेता कोण असणार आणि या ग्लॅमरस स्पर्धेला निलेश रेमजेच्या रुपाने नवा कोरा विजेता लाभला. ही स्पर्धा इतकी थरारक आणि अनपेक्षित होती की स्पर्धेत खेळणार्‍या स्पर्धकांसह आणि जजेसनाही विजेता कोण ठरणार याची कल्पना नव्हती. प्रत्येक गटात मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाल्यामुळे प्रत्येक गटातील अव्वल खेळाडूची निवड करताना जजेसना चांगलाच घाम फुटला. आठ गटातील अव्वल खेळाडू मुंबई श्रीच्या जेतेपदासाठी पोझिंगला उतरले तेव्हाही विजेत्याचा कुणाला अंदाज नव्हता. तेव्हा निलेशने गणेश उपाध्याय, संजय प्रजापती, अभिषेक माशेलकर या तगड्या स्थितीत असलेल्या खेळाडूंवर मात करत जेतेपदाला मिठी मारली. या मोसमात निलेश चक्क १६ स्पर्धा खेळला होता आणि फक्त एका स्पर्धेत त्याने गटविजेतेपद मिळवले होते. कोशिश करनेवालो की कभी हार नहीं होती, हे मानणार्‍या निलेशने आपल्या आठ वर्षांच्या शरीरसौष्ठव कारकीर्दीत पहिलेच जेतेपद जिंकले. तेसुद्धा मुंबई श्री. याला म्हणतात, छप्पर फाडके यश. तसेच गेली अनेक वर्षे मुंबई श्रीत उतरणार्‍या गणेश उपाध्यायला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत रेखा शिंदेला कुणीच आव्हान देऊ शकला नाही. तिने अपेक्षेप्रमाणे मुंबई श्रीवर पुन्हा आपलेच नाव कोरले.

संघटनेने पुन्हा वेळ साधली

जे राय फिटनेस आणि आय क्यू फिटनेसचे सहकार्य लाभलेल्या या स्पर्धेचा उत्साह खेळाडूंच्या अभूतपूर्व सहभागाने वाढवला. पण या सहभागाला चारचांद लावले संघटनेच्या वक्तशीर आयोजनाने. खेळाडूंच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहाणार्‍या संघटनेने खेळाडूंच्या मोठ्या उपस्थितीनंतरही स्पर्धेचे नियोजनबद्ध आणि वेळेत आयोजन केले. गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही संघटनेने स्पर्धा चक्क दहाच्या ठोक्याला संपवल्यामुळे खेळाडू आणि क्रीडाप्रेमींच्याही हृदयाचा ठोका चुकला. या स्पर्धेचे आपल्या ओघवत्या आणि स्फूर्तीदायक शैलीत निवेदन करून राणाप्रताप तिवारी यांनी खेळाडूंसह क्रीडाप्रेमींच्याही अंगावर शहारे आणले. स्पर्धेचा पारितोषिक सोहळा माजी खासदार गजानन कीर्तीकर, आमदार हारुन खान, मुंबई शरीरसौष्ठवाचे आजीवन अध्यक्ष अमोल कीर्तीकर, अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष किट्टी फनसेका, सरचिटणीस विशाल परब, सुनील शेगडे यांच्यासह शरीरसौष्ठव क्षेत्रातील दिग्गज शाम रहाटे, सागर कातुर्डे, हरमीत सिंग, उमेश गुप्ता आणि विक्रांत देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विजय झगडे, राजेश निकम, संतोष सावंत, जयदीप पवार यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी मेहनत घेतली.

मुंबई श्री २०२५ स्पर्धेचा निकाल

५५ किलो वजनी गट : १. राजेश तारवे (शाहु जिम), २.अक्षय गवाणे (पॉवर फिटनेस), ३. अर्जुन बांदिवडेकर (बॉडी वर्कशॉप), ४. रंजित बंगेरा (आदिअंश जिम), ५. सिध्दांत लाड (परब फिटनेस).

६० किलो : १. सुयश सावंत (शिवशक्ती जिम), २. मनोहर पाटील (परब फिटनेस), ३. संजय जाधव (आर.एम. भट जिम), ४. गीतेश मोरे (समर्थ जिम),५. ईश्वर ढोलम (परब फिटनेस).

६५ किलो : १. गणेश पारकर (परब फिटनेस), २. नदिम शेख (सावरकर जिम), ३. देव विश्वास (लाईफ फिटनेस), ४. हसीफुल शेख (परब फिटनेस), ५. स्टिफन रजा ( परब फिटनेस).

७० किलो : १. विशाल धावडे (बालमित्र व्यायामशाळा), २. संदिप सावळे (परब फिटनेस), ३. दिपेश पवार (जय भवानी व्यायामशाळा), ४. हितेन तामोरे (स्ट्रेंथ जिम), ५. मनिष वाघेला (आर्यन फिटनेस).

७५ किलो : १. गणेश उपाध्याय (परब फिटनेस), २. भगवान बोर्‍हाडे (परब फिटनेस), ३. विश्वंभर राऊळ (मॉंसाहेब जिम), ४. अमोल जाधव (बॉडी वर्कशॉप), ५. मंगेश भोसले (बॉडी वर्कशॉप).

८० किलो : १. संजय प्रजापती (बॉडी पंप जिम), २. सौरभ म्हात्रे (आय क्यु फिटनेस) , ३. ओमकार कलके (फिटनेस पॉईट), ४. कुणाल मंडाल (स्ट्रेंथ जिम), ५. रेवांश मनिडा (मॉंसाहेब जिम).

८५ किलो : १. अभिषेक माशेलकर ( बॉडी फिटनेस), २. आयुष तांडेल (परब फिटनेस), ३. सुलतान पठाण (द फ्लेक्स), ४. रोहन कांदळगांवकर (परब फिटनेस), ५. अमनकुमार मिश्रा (जय भवानी व्यायामशाळा).

८५ किलोवरील : १. निलेश रेमजे (परब फिटनेस), २. अरुण नेवरेकर (हर्क्युलस फिटन्ोस), ३. अभिषेक लोेंढे (हर्क्युलस फिटनेस).
मुंबई श्री विजेता : निलेश रेमजे (परब फिटनेस), उपविजेता : गणेश उपाध्याय (परब फिटनेस).

मेन्स फिटनेस (१७० सेमीपर्यंत) : १. मंगेश भोसले (बॉडी वर्कशॉप), २. आकाश जाधव (बॉडी वर्कशॉप), ३. साहिल सावंत (मॉंसाहेब जिम),४. देव विश्वास (लाईफ फिटनेस), ५. अर्जुन बांदिवडेकर (बॉडी वर्कशॉप).

मेन्स फिटनेस (१७० सेमीवरील) : १. निलेश गुरव (मॉंसाहेब जिम), २. विश्वंभर राऊळ (मॉंसाहेब जिम), ३. अमर पटेल (हर्क्युलस फिटनेस), ४. रॉजर टाऊरो (बॉडी वर्कशॉप), ५. करण बावरे (स्ट्रेंथ जिम)

महिला शरीरसौष्ठव : १. रेखा शिंदे ( बॉडी फिट जिम), २. ममता येझरकर (फोकस फिटनेस), ३. किमया बेर्डे (प्लेस फिटनेस), ४. लवीना नरोना (अ‍ॅक्टीव फिटनेस), ५. राजश्री मोहिते (केन्झो फिटनेस).
मिस मुंबई : रेखा शिंदे (बॉडी फिट जिम)
Comments
Add Comment

माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांचे निधन

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील माजी आमदार, अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांचे

BSNL युजर्ससाठी खुशखबर; नेटवर्क नसले तरी करता येतील कॉल्स आणि मेसेज

मुंबई : मोबाईल नेटवर्क नसले तरी आता कॉल आणि मेसेज करता येणार आहेत. होय तुम्ही बरोबर वाचताय. नवीन वर्षाच्या

कोणतीही चूक, निष्काळजीपणा किंवा नियमभंग सहन करणार नाही महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आचारसंहितेच्‍या कालावधीत प्रत्येक कृतीची नियमांनुसार अचूक व वेळेत नोंद घेणे बंधनकारक

BMC Election 2026 : वांद्रेत मनसेला खिंडार! 'मशाली'ला विरोध करत निष्ठावंतांचा भाजपमध्ये प्रवेश; ११ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

मुंबई : निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष शर्थीचे प्रयत्न करत

Mumbai Crime... मुंबईत खळबळ! न्यू इअर पार्टी साठी घरी बोलावून, गर्लफ्रेंडने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टलाच...

मुंबई : मुंबईत नववर्षाच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. सांताक्रूझ पूर्व येथील कालिना परिसरात एका महिलेने

UTA APP... UTS अॅपला रामराम! मुंबई लोकल प्रवाशांसाठी 'हे' नवे ॲप, एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व रेल्वे सेवा

मुंबई : दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच