'स्वामी समर्थ श्री २०२५'साठी १२५ जण दाखवणार शरीरासौष्ठव, विजेत्यांसाठी ३ लाखांची बक्षीसे

मुंबई : स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या कल्पक आयोजनाखाली प्रभादेवीत दत्तू बांदेकर चौकात रविवारी ९ मार्चला होत असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकापेक्षा एक अशा १२५ पेक्षा अधिक खेळाडूंमध्ये द्वंद्व रंगलेले पाहायला मिळेल.



गेली आठ दशके कबड्डीसह शरीरसौष्ठव खेळात एकापेक्षा एक स्पर्धांचे आयोजन करण्याबरोबर खेळाडू घडवणार्‍या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने यंदा आपल्या स्पर्धेला भव्य आणि दिव्य करण्यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून शरीरसौष्ठवांना 'स्वामी समर्थ श्री' मध्ये उतरण्याचे आवाहन केल्याचे स्पर्धाप्रमुख जयराम शेलार यांनी सांगितले. त्यामुळे सुमारे सव्वाशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविल्याची माहिती महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेंद्र चव्हाण यांनी दिली. सव्वा तीन लाखांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव केला जाणार्‍या या स्पर्धेत विजेत्याला ५५,५५५ रुपयांचे इनाम दिले जाणार असून उपविजेत्याच्या मेहनतीलाही प्रोत्साहन म्हणून २२,२२२ रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८०, ८५ आणि ८५ किलोवरील अशा एकंदर आठ गटात खेळली जाणार असून प्रत्येक गटात पहिल्या पाच खेळाडूंना ८, ६, ५, ४ आणि ३ हजार अशी रोख रकमेची बक्षीसेही दिली जातील.



महिला आणि दिव्यांगाचीही स्पर्धा

राज्यातील शरीरसौष्ठवपटूंच्या थराराबरोबर महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेचाही एक गट या स्पर्धेत खेळविला जाणार आहे. यातही राज्यातील अव्वल महिला शरीरसौष्ठवांचा सहभाग निश्चित असल्याची माहिती राजेंद्र चव्हाण यांनी दिली. एवढेच नव्हे तर दिव्यांगाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेलाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.

वाकडे, म्हात्रेवर क्रीडाप्रेमींचे लक्ष

स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने या स्पर्धेची भव्यता वाढविण्यासाठी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा घेतली आहे. या स्पर्धेत भारत श्री स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणारे शशांक वाकडे (मुंबई), विश्वनाथ बकाली (सांगली), रामा मायनाक (सातारा), नितीन म्हात्रे (पश्चिम ठाणे), रोशन नाईक (पालघर) या दिग्गजांसह अर्शद मेवेकरी (सांगली), ओंकार नलावडे (पुणे), पंचाक्षरी लोणार (सोलापूर), संतोष शुक्ला (ठाणे), नीलेश खेडेकरसारखे (मुंबई) तयारीतले खेळाडू आपल्या पीळदार देहयष्टीची किमया दाखविणार आहेत. प्रभादेवीत अनेक वर्षांनतर राज्यस्तरीय ग्लॅमर असलेली मोठी स्पर्धा होतेय, ज्यात महाराष्ट्र शरीरसौष्ठवाची खरी पीळदार श्रीमंती मुंबईकरांना पाहायला मिळेल. प्रत्येक गटात गटविजेतेपदासाठी प्रचंड संघर्ष होणार असल्यामुळे स्वामी समर्थ श्री ग्लॅमरस आणि संस्मरणीय होणार हे निश्चित आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजेंद्र चव्हाण (९८७००२३२३५), राज यादव (९६१९४७७२५१), राजेंद्र गुप्ता (९८२०७६७४०३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला