Ind vs NZ : भारत - न्यूझीलंड आमनेसामने, दुबईत रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना रविवार ९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असलेल्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे.



यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत अ आणि ब असे दोन गट होते. प्रत्येक गटात चार संघ होते. यामुळे प्रत्येक संघाला गटातील इतर तीन संघांसोबत एक - एक सामना खेळायचा होता. या नियोजनानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये प्रत्येक संघ तीन साखळी सामने खेळणार होता. यानंतर उपांत्य फेरीत अ गटातील पहिल्या क्रमांकाचा संघ विरुद्ध ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ आणि दुसऱ्या उपांत्य सामन्यात अ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ विरुद्ध ब गटातील पहिल्या क्रमांकाचा संघ अशी प्रत्येकी एक लढत झाली. अ गटातून अनुक्रमे भारत आणि न्यूझीलंड आणि ब गटातून अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन आणि न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.



भारताने यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील आतापर्यंत झालेले सर्व चार सामने जिंकले. तर न्यूझीलंडने साखळी फेरीतला भारताविरुद्धचा सामना वगळता इतर तीन सामने जिंकले. आता अंतिम फेरीच्या निमित्ताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये दुसऱ्यांदा भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील. हा सामना जिंकणारा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकणार आहे.



याआधी चॅम्पियन्स ट्रॉफी २००० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनसामने होते. या सामन्यात भारताला हरवून न्यूझीलंडने बाजी मारली होती. भारताने प्रथम फलंदाजी करुन २६४ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने सामना दोन चेंडू आणि चार गडी राखून जिंकला होता. या अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी भारताला रविवार ९ मार्च २०२५ रोजी मिळणार आहे. यामुळे अंतिम सामन्यात भारत कसा खेळतो याकडे अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.



भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, रिषभ पंत

न्यूझीलंड संघ : टॉम लॅथम (यष्टीरक्षक) , मिशेल सँटनर (कर्णधार) , विल यंग , ​​रचिन रवींद्र , केन विल्यमसन , डॅरिल मिशेल , ग्लेन फिलिप्स , मायकेल ब्रेसवेल , मॅट हेन्री , काइल जेमिसन , विल्यम ओरोर्क , नॅथन स्मिथ , मार्क चॅपमन , डेव्हॉन कॉनवे , जेकब डफी

सामना कुठे बघता येणार ?

टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि स्पोर्ट्स १८ नेटवर्कच्या क्रीडा वाहिन्यांवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण रविवार ९ मार्च २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणार आहे. तसेच जिओ हॉटस्टार या अॅपवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग रविवार ९ मार्च २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणार आहे.
Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या