पालघर जिल्ह्यातील साडेचार लाख वाहनधारकांनी फिरवली पाठ

  42

उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटसाठी केवळ १४ हजार अर्ज


विरार : एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे असले तरी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांमध्ये मात्र ही नंबर प्लेट बसविण्यासाठी निरुत्साहीपणा दिसून येत असून जिल्ह्यातील साडेचार लाखांहून अधिक वाहनधारकांनी अद्याप अर्जच केले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


वाहनांची चोरी, गैरवापर टाळण्यासोबतच अपघात झाल्यास संबंधित वाहन मालकाची सर्व माहिती सहजपणे मिळविण्यासाठी एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना अत्याधुनिक सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यात येत आहेत. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वितरकाकडूनच ही नंबर प्लेट उपलब्ध करून दिली जाते. मात्र एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना अशा प्रकारची नंबर प्लेट बसविण्यात आलेली नाही.



त्यामुळे वाहनांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांवर अत्याधुनिक हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यात येत आहेत. संपूर्ण देशात ही प्रक्रिया सुरू असून महाराष्ट्रामध्ये ३० एप्रिल २०२५ या तारखेपूर्वी अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन असलेली नंबर प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.


यासाठी सर्वच शहरांमध्ये अधिकृत केंद्र देखील उघडण्यात आलेले आहेत. तसेच वाहनधारकांना स्वतःदेखील ऑनलाईन प्रक्रिया करून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट मिळवता येणार आहे. दरम्यान, एप्रिल २०१९ पूर्वीची ४ लाख ७८ हजार ९३१ वाहने पालघर जिल्ह्यात आहेत. त्यापैकी केवळ १३ हजार ४६३ वाहनधारकांनी ५ मार्चपर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटसाठी अर्ज केलेले आहेत, तर ३ हजार ९०७ वाहनांना ह्या नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. परिणामी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट वाहनांना बसविण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.


एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविण्याबाबत आवश्यक जनजागृती करण्यात येत आहे. भविष्यातील दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांनी अधिकृत केंद्रात नोंदणी करून वाहनांना नंबर प्लेट बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. - अतुल आदे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पालघर
Comments
Add Comment

मुंबईत अग्नितांडव, घाटकोपर इमारतीला मध्यरात्री भीषण आग, १३ जण जखमी...

मुंबई :  मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १३ जण जखमी झाले आहेत.

ST Corporation Decision : एसटी मालवाहतूक सेवा बंद करण्याचा महामंडळाचा निर्णय...

मुंबई : करोना काळात एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पादनात (ST  वाढ व्हावी यासाठी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरु केली

विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मोफत वसतिगृह, समाजकल्याण विभागाची नवीन योजना...

  मुंबई :  राज्य सरकारच्या  समाजकल्याण विभागाने (social welfare) मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हिताचा

पुण्यात संत तुकाराम महाराजांची पालखी, वाहतुकीत होणार मोठे बदल...

पुणे : संत तुकाराम  महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्काम असणार आहे, त्यामुळे पुणे पोलिस वाहतूक विभागाने मोठे बदल

पर्यटनाच्या नावाखाली गांजाची तस्करी, २५ कोटींचा गांजा जप्त...

मुंबई : भारतात गेल्या काही महिन्यांपासून गांजा विकण्याचं प्रमाण वाढतं चाललेलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज

मुंबई विद्यापीठाची सुधारणा, शिक्षण संस्थाच्या यादीत १७ व्या क्रमांकावर...

मुंबई : क्वॅकेरली सायमंडतर्फे (क्यूएस) जागतिक विद्यापीठ क्रमवारी  २०२६ नुकतीच जाहीर करण्यात आली.  गतवर्षीयाच्या