जीएमएलआर प्रकल्पांतर्गत पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ वापरा

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांचे निर्देश


आरेतील बोगद्याचे काम ऑगस्टपासून सुरु होणार


मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (जीएमएलआर) अंतर्गत होणाऱ्या कामांसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी (आरे फिल्मसिटी )येथील बोगदा प्रकल्पाच्या भुयारीकरणासाठी संयंत्र (टनेल बोअरिंग मशीन) ऑगस्ट महिन्यामध्ये दाखल होणार आहे. हे 'टीबीएम' संयंत्र ठेवण्यासाठी चित्रनगरी व्यवस्थापनाकडे भूखंड उपलब्ध करून देण्याकामी विनंती करण्यात आली असून महानगरपालिका अधिकाऱ्यांनी-यांनी त्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश बांगर यांनी दिले.


मुंबई महानगरातील पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा सुमारे १२.२० किलोमीटरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी गुरुवारी ६ मार्च २०२५ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. प्रमुख अभियंता (पुल) उत्तम श्रोते यावेळी उपस्थित होते.


गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प अंतर्गत दिंडोशी-गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान सहा पदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याची उंची १, २६५ मीटर आहे. उड्डाणपुलासाठी बॉक्स गर्डर व उच्चस्तरीय काँक्रिटचा वापर केला जात आहे. तसेच, रस्ता ओलांडण्याकरिता पादचारी पूल, स्वयंचलित सरकता जिन्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रत्नागिरी जंक्शन येथे उड्डाणपुलाला आधार देणारे ४ उभे खांब (पिअर्स) वगळता उर्वरित काम अंतिम टप्प्यात आले आहे. रत्नागिरी हॉटेल जंक्शन येथील संरचनात्मक अंमलबजावणी पद्धती कशी असावी याबाबत सल्लागार यांच्यासमवेत बांगर यांनी विचारविनिमय केला. तसेच, भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) अभिप्रायानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतरच प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाईल, असेही बांगर यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपचे आंदोलन

निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा 'मविआ' चा कट उधळून लावा – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई: आगामी

वेध निवडणुकीचा : कलिना आणि वांद्रे पूर्व भाजपसाठी अनुकूल; २० ते २२ नगरसेवक निवडून येतील

उत्तर मध्य भाजप जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास सचिन धानजी मुंबई : मुंबई उत्तर मध्य

मुंबईत राजकीय रणकंदन पेटले! विरोधकांच्या ‘सत्याचा मोर्चा’ला भाजपचे 'मूक आंदोलन' करत जशास तसे प्रत्युत्तर

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील मोठ्या गोंधळावर आक्षेप घेत, आज (दि. १) मुंबईत महाविकास

रस्त्यांच्या नियमित स्वच्छतेसाठी रस्ते दत्तक उपक्रम महापालिका राबवणार, कनिष्ठ पर्यवेक्षकांवर दोन ते तीन रस्त्यांची जबाबदारी सोपवणार

मुंबई : मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची समस्या निकालात काढण्यासाठी महापालिकेने रस्ते

मुंबईत जमिनीखाली १८ मीटर खोलवर भुयारी मेट्रोला मिळणार बीएसएनएलचे नेटवर्क ?

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील काही दिवसांपूर्वी जेव्हीआरएल-बीकेसी-कफ परेड या भुयारी मेट्रो

भांडुप उषा नगर नाल्यावरील पुलांची कामे धिम्या गतीने, पण खर्च वाढला एवढा

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने भांडुप येथील उषा नगर नाल्यावरील जुन्या पुलांचे बांधकाम पाडून