Shahira Seema Patil : शाहिरा सीमा पाटील यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

  185

मुंबई : लोककला, लोकसंगीताची आवड असणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीने, नृत्यांगनेने लावणीला प्राधान्य दिले आहे. या लावणीचा प्रगतीचा टप्पा म्हणून याच नृत्यांगनानी गाणी गाणे,निर्मिती,नृत्य दिग्दर्शन,स्वतःची नृत्य संस्था यांना प्राधान्य दिले आहे.पण त्याही पुढची पायरी गाठून अभिनेत्री,नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका, निर्माती, शाहिरा सीमा पाटील (Shahira Seema Patil) यांनी महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे. ते म्हणजे शाहिर व्हायचे तर पुरुषांनीच असा काहीसा रिवाज होता. पण गेल्या काही दशकात महिलांनी सुद्धा यात पुढाकार घेतलेला आहे. अलीकडच्या काळात ज्यांचे गौरवाने नाव घेतले जाते. त्यात शाहिरा पाटील यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. पाटील यांनी मेहनत घेऊन ही शाहिरी कला काय आहे हे जाणून घेतले आणि त्या दृष्टीने व्यावसायिक रंगमंचावरती त्याचे प्रयोग करणे सुरू केले. त्यांचा हा प्रवास एवढ्या पुरतीच मर्यादित राहिलेला नाहीत तर ज्या क्रांतिवीरांनी देशाला वेगळे वळण दिले आहे.



अशा कर्तृत्वान व्यक्तींचा जीवन प्रवास शाहिरीच्या माध्यमातून सादर करण्यात त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, माता रमाई, माँसाहेब जिजाबाई आधी अनेकांच्या कर्तुत्वाचा त्यागाचा शौर्याचा आलेख त्यांनी प्रत्येक वेळी शाहिरीतून मांडलेला आहे. पाटील यांचे योगदान लक्षात घेऊन अनेक वाहिन्याने त्यांना विशेष कार्यक्रमात सादरीकरण करण्यासाठी बोलवलेले आहे. इतकेच काय तर पुणे, मुंबई महानगरपालिकेने महापौर प्रतिष्ठेचा असलेला पुरस्कार त्यांना दिलेला आहे. आता त्यांना स्वतःला अभिमान वाटावे अशी गोष्ट ८ मार्च जागतिक महिलादिनी होणार आहे. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाई आंबेडकर पुरस्कार हा त्यांना जाहीर झालेला आहे. 'इंटरनॅशनल शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्राईब रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉन्फेडरश' ही संस्था दिल्ली येथे कार्यकर्ते. रमाई यांचे विचार, त्यांचे सामाजिक, कौटुंबिक कार्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जागतिक पातळीवर पोहोचवण्याचे काम करते.

Comments
Add Comment

'मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार'

मुंबई : जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी

अनंत चतुर्दशीनिमित्त चर्नी रोड स्थानकावरील लोकल गाड्यांच्या वेळेत बदल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या जलद लोकल गाड्या येत्या शनिवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १०:३० पर्यंत मुंबई

बापरे, 'झोमॅटो'वरुन ऑर्डर करणे होणार एवढे महाग

मुंबई : ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी झोमॅटोने प्लॅटफॉर्म शुल्कात दोन रुपयांची वाढ केली आहे.

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार

मुंबई : महाराष्ट्र सरकारने लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत ५ कोटी रुपयांना लिलावात जिंकली असून, तेथे छत्रपती

मराठ्यांपाठोपाठ ओबीसींसाठीही उपसमितीची स्थापना

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला.

मॅरेथॉन स्पर्धेबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात