चिवडा, वेफर्ससह कुरकुरीत पदार्थांच्या पॅकेजिंगवर बंदी आणा, भाजपा नगरसेविकेची मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई मोठ्या प्रमाणात कचरा होण्यास चिवडा,वेफर्स यांची वेष्टने ही कारणीभूत असतात. याचं पॅकेजिंगच्या कव्हर मुळे अनेकदा पावसाळ्यात नाले तुंबून मुंबई जलमय होते. त्यामुळे वेफर्स, चिवडा, कुरकुरीत खाद्यपदार्थ (स्नॅक्स), इत्यादी खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या अविघटनशील प्लास्टीक वेष्टनांवर बंदी घालण्यात येण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी मुंबई महापालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी करत अशा खाद्यपदार्थांच्या उत्पादन कंपन्यांना व वितरकांना विघटनशील तथा पर्यावरणपूरक आवेष्टनाचा (पैकेजिंग) वापर सक्तीने लागू करता येईल अशी नियमावली बनवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारशी पाठपुरावा करण्याची सूचना केली आहे.


भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी महापालिका सभागृहात ठरावची सूचना मांडली आहे. या सूचनेमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, सध्या आबालवृद्धांपर्यंत वेफर्स, चिवडा, कुरकुरीत खाद्यपदार्थाच्या पुढया (पॅकेटस) पाच ते दहा रुपयांत सहन उपलब्ध होत असल्याने, अशा उत्पादनांची मोठया प्रमाणावर विक्री होत असते. मात्र, अशा साद्यपदार्थाचे सेवन केल्यानंतर, त्यांचे प्लास्टिक वेष्टन रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी, पदपथांवर इतस्ततः तसेच, नाल्यांमध्ये टाकण्यात येत असल्याचे सर्रास निदर्शनास येते. त्यामुळे मुंबई शहरामध्ये कचच्याच्या प्रभागात अधिकाधिक वाढ होते.


याची प्लास्टिक वेष्टने अविघटनशील असतात आणि ती नाल्यांच्या मुखाशी जाऊन जमा झाल्याने, पाणी तुंबून पावसाळ्यात पूरसदृश स्थिती निर्माण होते. शिवाय, साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरुन आरोग्यविधातक परिस्थिती निर्माण होते.


त्यामुळे वेफर्स, चिवडा, कुरकुरीत खाद्यपदार्थ (स्नॅक्स), इत्यादी खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या अविघटनशील प्लास्टीक वेष्टनांवर बंदी घालण्यात यावी आणि अशा खाद्यपदार्थांच्या उत्पादन कंपन्यांना व वितरकांना विघटनशील / पर्यावरणपूरक आवेष्टनाचा (पैकेजिंग) वापर सक्तीने लागू करता येईल अशी महानगरपालिकेने नियमावली बनवावी असे नमूद केले आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून