Sunday, March 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजबार्बाडोसकडून मिळालेल्या सर्वोच्च सन्मानासाठी पंतप्रधान मोदींनी मानले आभार, पुरस्कार भारतीयांना समर्पित

बार्बाडोसकडून मिळालेल्या सर्वोच्च सन्मानासाठी पंतप्रधान मोदींनी मानले आभार, पुरस्कार भारतीयांना समर्पित

बार्बाडोस : कोविड काळात भारताने दिलेली मदत आणि पाठिंबा याची जाणीव ठेवून बार्बाडोस सरकारने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा जाहीर गौरव केला. पंतप्रधान मोदी यांच्यावतीने ‘ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ हा पुरस्कार भारताचे परराष्ट्र आणि कापड उद्योग राज्यमंत्री पाबित्रा मार्गेरिटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन बार्बाडोसचे सरकार आणि तिथल्या जनतेचे जाहीर आभार मानले. बार्बाडोस सरकारने दिलेला पुरस्कार म्हणजे कोट्यवधी भारतीयांचा सन्मान असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. एक्स पोस्ट करुन पंतप्रधान मोदी यांनी बार्बाडोसचे आभार मानले.

रशिया – युक्रेन संघर्ष थांबणार, इंग्लंड, फ्रान्स आणि युक्रेन संयुक्तपणे शस्त्रसंधीचा प्रस्ताव तयार करणार

बार्बाडोसचे पंतप्रधान अमोर मोटले यांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी गुयानातील जॉर्जटाउनमध्ये भारत-कॅरिकॉम नेत्यांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली. हा पुरस्कार मार्च २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला.

Terrorists Attack : पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात १२ ठार, ३० जखमी

कोविड-१९ साथीच्या काळात धोरणात्मक नेतृत्व आणि मौल्यवान मदतीसाठी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याचे बार्बाडोस सरकारने जाहीर केले. महामारी काळात मोदींच्या नेतृत्वात मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि पाठिंब्यामुळे बार्बाडोसला या संकटातून सावरण्यास मदत मिळाली, असेही बार्बाडोस सरकारने सांगितले.

पंतप्रधान मोदींच्यावतीने पुरस्कार स्वीकारल्यानंतर पाबित्रा मार्गेरिटा यांनी बार्बाडोस सकारविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान मोदींचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यांच्या वतीने हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे, असे पाबित्रा मार्गेरिटा यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -