Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजरशिया - युक्रेन संघर्ष थांबणार, इंग्लंड, फ्रान्स आणि युक्रेन संयुक्तपणे शस्त्रसंधीचा प्रस्ताव...

रशिया – युक्रेन संघर्ष थांबणार, इंग्लंड, फ्रान्स आणि युक्रेन संयुक्तपणे शस्त्रसंधीचा प्रस्ताव तयार करणार

लंडन : फेब्रुवारी २०२२ पासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी युरोपमध्ये वेगाने हालचाली सुरू आहेत. इंग्लंड, फ्रान्स आणि युक्रेन संयुक्तपणे शस्त्रसंधीचा प्रस्ताव तयार करुन अमेरिकेपुढे सादर करणार आहेत. अमेरिकेने शिक्कामोर्तब केल्यानंतर हा प्रस्ताव रशियासमोर जाईल आणि परस्पर सहमतीने शस्त्रसंधीच्या करारावर सह्या होतील.

ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यात शा‍ब्दिक चकमक, युक्रेनच्या अडचणीत वाढ

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेत जाऊन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. याप्रसंगी ट्रम्प यांनी युक्रेनला आणखी बेचिराख होण्यापासून वाचवण्यासाठी शस्त्रसंधी करा, असे आवाहन केले. या मुद्यावरुन झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली होती. यानंतर अमेरिकेतून युरोपसाठी रवाना झालेल्या झेलेन्स्की यांनी इंग्लंडचे पंतप्रधान केयर स्टॉर्मर यांची भेट घेतली. या भेटीत स्टॉर्मर यांनी इंग्लंड आणि युरोपियन युनियनचे सदस्य देश युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे आश्वासन दिले. यावेळी झालेल्या चर्चेअंती इंग्लंड, फ्रान्स आणि युक्रेन संयुक्तपणे शस्त्रसंधीचा प्रस्ताव तयार करुन अमेरिकेपुढे सादर करतील, असे ठरले. शस्त्रसंधी कराराच्या मसुद्याचे काम सुरू करण्याआधी इंग्लंडचे पंतप्रधान युक्रेनसह युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. लंडनमध्ये होणार असलेल्या या चर्चेत इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, इटली, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, स्पेन, कॅनडा, फिनलंड, स्वीडन, झेक प्रजासत्ताक आणि रोमानियाचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री, नाटो सरचिटणीस आणि युरोपियन कमिशन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष देखील सहभागी होतील.

ट्रम्प यांनी युक्रेनला केलेले शस्त्रसंधीचे आवाहन

फेब्रुवारी २०२२ पासून रशिया आणि युक्रेन यांच्यात लष्करी संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष थांबवा, शस्त्रसंधी जाहीर करा आणि स्वतःच्या बेचिराख होत असलेल्या देशाला वाचवा असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना केले. रशिया विरुद्धच्या संघर्षात युक्रेनचा विजय होणार नाही या वास्तवाचे भान राखा आणि स्वतःच्या देशाला वाचवण्यासाठी शस्त्रसंधी जाहीर करा; असेही ट्रम्प म्हणाले. अमेरिकेने युक्रेनला ३५० अब्ज डॉलर एवढी प्रचंड मदत दिली. लष्करी मदत केली. शस्त्रसाठा दिला. ही मदत दिली नसती तर युक्रेन दोन आठवडे पण लढू शकला नसत; असे ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना स्पष्ट शब्दात सांगितले. यानंतर अमेरिकेतून इंग्लंडला गेलेल्या झेलेन्स्की यांनी इंग्लंडचे पंतप्रधान केयर स्टॉर्मर यांची भेट घेतली. या भेटीनंतर इंग्लंड, फ्रान्स आणि युक्रेन संयुक्तपणे शस्त्रसंधीचा प्रस्ताव तयार करुन अमेरिकेपुढे सादर करतील; असे स्टॉर्मर यांनी सांगितले.

युक्रेन अमेरिकेसोबत खनिज संपत्ती करार करणार

युक्रेनने अमेरिकेसोबत खनिज संपत्ती करार करणार असल्याचे जाहीर केले आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी १ मार्च रोजी या संदर्भातील घोषणा एक्स पोस्ट करुन केली होती. ट्रम्प यांच्याशी शस्त्रसंधीच्या मुद्यावरुन शाब्दिक चकमक झाली तरी अमेरिका कायम युक्रेनच्या पाठिशी असल्याचा विश्वास झेलेन्स्की यांनी व्यक्त केला. आता इंग्लंडच्या पंतप्रधानांनी झेलेन्स्की यांच्यासोबत झालेल्या चर्चेअंती इंग्लंड, फ्रान्स आणि युक्रेन संयुक्तपणे शस्त्रसंधीचा प्रस्ताव तयार करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबण्याची शक्यता वाढली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -