Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीTerrorists Attack : पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात १२ ठार, ३० जखमी

Terrorists Attack : पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात १२ ठार, ३० जखमी

– सहा दहशतवाद्यांचा खात्मा – दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी

लाहोर : पाकिस्तानातील लाहोर इथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी या क्रिकेट स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंडच्या संघांतील उपांत्य सामन्यापूर्वी पाकिस्तानच बॉम्ब हल्ल्यांनी हादरला आहे. येथील खैबर पख्तूनख्वा प्रांतात दोन बॉम्बस्फोट झालेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचं वृत्त आहे. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण ठार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला मंगळवारी रात्री उशिरा झाला.हल्लेखोरांनी बन्नू तळाच्या प्रवेशद्वारातून स्फोटकांनी भरलेल्या दोन कार आत आणल्या आणि त्यांची टक्कर घडवून आणली. ज्यामुळं हे स्फोट झाले. या आत्मघातली हल्ल्यात तीन लहान मुलांसह १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहे. यानंतर १२ दहशतवाद्यांनी इफ्तारनंतर बन्नू केंट या ठिकाणी असलेल्या सुरक्षा कड्यावर हल्ला केला. या हल्ल्याचं उत्तर देताना लष्करानं तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेच्या ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचं वृत्तही समोर आलं आहे.

PM Modi : भारताच्या स्थिर धोरणांमुळे जागतिक भागीदारीला चालना: पंतप्रधान मोदी

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की दहशतवाद्यांनी जे स्फोट घडवून आणले ते स्फोट इतक्या भीषण स्वरुपाचे होते की, ४-४ फुटांच्या अंतरावर रस्त्यात दोन मोठे खड्डे तयार झाले. तर ८ घरं उद्ध्वस्त झाली. मशिदीतील छप्परही एका क्षणात कोसळलं. या हल्ल्याची जबाबदारी हाफिज गुल बहादूर याच्या नेतृत्त्वातील दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. रमजानचा उपवास सोडत असतानाच हा हल्ला झाला त्यामुळे एकच खळबळ उडाली. या ठिकाणी आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. तसंच धुराचे आणि धुळीचे लोटही मोठ्या प्रमाणावर उठले होते.या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या भ्याड हल्ल्याची निंदा केली आहे.त्यांनी म्हटलं आहे की, रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. या दरम्यान उपवास सोडणाऱ्या नागरिकांवर भ्याड हल्ला करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध नोंदवतो. जे लोक ठार झाले त्यामध्ये तीन लहान मुलं दोन महिला यांचाही समावेश आहे. दरम्यान सुरक्षा दलांची आणि दहशतवाद्यांची चकमक झाली त्या चकमकीत ५ ते ६ दहशतवादी ठार झाले अशीही माहिती समोर आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -