मिठी नदी सफाई कामांच्या निविदेतच घोटाळा; एसआयटी मार्फत चौकशीची मागणी

मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामांसाठी महापालिकेच्यावतीने काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर तसेच आजवर देण्यात आलेल्या सफाईच्या कामांबाबत मनसेने तीव्र आक्षेप नोंदवून आता काढण्यात आलेली निविदा रद्द करून या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलतांना केली.


मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांना निवदेन देवून त्यांनी मिठी नदीतील गाळ काढण्याबाबत तसेच मुंबईतील मोठ्या नाल्यातील सफाई कामांच्या निविदेत घोटाळा झाल्याचा आरोप केला. या निविदेनामध्ये बाळा नांदगावकर यांनी असे नमुद केले आहे की, हे नालेसफाईचे काम एकाच कंपनीला देण्याचा प्रयत्न असून यात डी बी एंटरप्रायझेसस एमएम रनोजा डेव्हलपमेंट कार्पौरेशन, त्रिदेव इन्फ्राप्रोजेक्ट आणि तनिषा एंटरप्रायझेस यांनाच काम मिळेल अशाप्रकारचे या निविदेत अट घालण्यात आल्याचे म्हटले आहे.



मिठी नदीमध्ये शिल्टपुशर आणि स्टक्चलर आदींचा वापर केला जात असून या मशिनची मक्तेदारी केवळ एकाच कंपनीकडे आहे. या कंपनीला प्रत्येक कामांसाठी दोन वर्षांसाठी ९ कोटी रुपये द्यावे लागते आणि या मशिनची एनओसी ज्यांच्याकडे नसेल त्यांना काम मिळत नाही. त्यामुळे या शिल्टपुशर मशिनची अट घालून ठराविक कंपन्यांना काम देण्याचा आणि या मशिनच्या भाड्यापोटी जाणारे पैसे गृहीत धरता महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे केरळमध्ये जी मशिन ९० लाखांमध्ये मिळते, त्याच मशिनचे भाडे तीन विभागांमध्ये दिल्या जाणाऱ्या कंत्राट कामांमध्ये प्रत्येकी कंत्राटदारांकडून ९ कोटी रुपये घेतले जातात. त्यामुळे या मशिन्स महापालिकेने स्वत: खरेदी करून उपलब्ध करून दिल्या जाव्यात अशाप्रकारची मागणीही नांदगावकर यांनी केली आहे. यासर्व प्रकरणांची एसआयटी मार्फत चौकशी करावी तसेच फौजदारी गुन्हेही दाखल करावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Municipal Schools : महापालिका शाळांमधील मुलांसाठी वह्या, स्टेशनरी आणि गणवेश खरेदीला मान्यता

शालेय साहित्य खरेदीला विलंब, मुलांना मिळणार उशिराने मुंबई : मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यात

Mumbai Waste Management : भायखळा ते शीव पर्यंतचा भाग लोटला जाणार कचऱ्यात

सलग दुसऱ्यांदा कचरा खासगीकरणाचा प्रस्ताव फेटाळला मुंबई : मुंबईतील कचऱ्याचे खासगीकरण करण्याच्या सर्व

Mumbai News: वाकोला-बीकेसी पुलाबाबत मोठी बातमी! ९८% काम पूर्ण, मुंबईकरांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत

मुंबई:मुंबई शहरातील वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (SCLR)

KEM Hospital : प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्येही एमआरआयसह सीटी स्कॅनची सुविधा वाढवा

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली मागणी मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) एमआरआय (MRI)

Veermata Jijabai Bhosale Botanical Udyan and Zoo : राणीबागेत आता ई-बग्गीतुन फिरता येणार पर्यटकांना!

बच्चे कंपनींसाठी आकर्षक डबल डेकर बसचीही सुविधा मुंबई : जिजामाता उद्यानात फिरणे आता अधिक आरामदायी आणि

BMC News : अंधेरीतील चार हॉटेल आणि बारवर महानगरपालिकेकडून तोडक आणि जप्तीची कारवाई

उपाहारगृह (हॉटेल) परिसरातील अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षण यंत्रणा कायमस्वरूपी सुस्थितीत व कार्यरत अतिरिक्त