Mumbai News: वाकोला-बीकेसी पुलाबाबत मोठी बातमी! ९८% काम पूर्ण, मुंबईकरांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत

मुंबई:मुंबई शहरातील वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) विस्तार प्रकल्पातील वाकोला ते बीकेसीदरम्यानचा (Vakola to BKC) महत्त्वाचा पूल (Brigde) लवकरच वाहनचालकांसाठी खुला होणार आहे. या पुलाचे सुमारे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून जूनअखेरीस तो वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.


मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील संपर्क अधिक सुलभ करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यामुळे आधीच अनेक भागांतील प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. मात्र वाकोला, कुर्ला आणि वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) परिसरात वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम होती.



या प्रकल्पात एकूण तीन पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यापैकी दोन पूल यापूर्वीच वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. आता वाकोला-बीकेसी हा तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा पूल अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.


हा पूल वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, विद्यापीठ जंक्शन आणि बीकेसी जंक्शन या महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे. या दोन मार्गिकांच्या प्रकल्पासाठी सुमारे ६४५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.


अधिकृत माहितीनुसार, राज्यातील निवडणूक आचारसंहितेनंतर म्हणजेच २५ जूननंतर या पुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्यानंतर लवकरच वाहनचालकांसाठी हा मार्ग खुला होऊ शकतो.


हा पूल सुरू झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावरून बीकेसीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे वाकोला ते बीकेसी हा प्रवास सध्या लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी होऊन अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईतील हजारो प्रवाशांना रोजच्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १०

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत