सोन्याच्या तस्करीत आयपीएसची मुलगी असलेल्या लोकप्रिय अभिनेत्रीचा हात

बंगळुरू : वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी आणि लोकप्रिय कन्नड (कानडी) अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला डीआरआयच्या (Directorate of Revenue Intelligence or DRI / महसूल गुप्तचर संचालनालय) पथकाने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. रान्या पोलीस कॉन्स्टेबल (हवालदार) बसवराजूच्या मदतीने सुरक्षा तपासणी टाळून विमानतळावरुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. पण डीआरआयच्या पथकाने रान्याला अडवले. यानंतर रान्याची आणि तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत रान्याने शरीराभोवती लपेटलेल्या पट्ट्यात १२.५६ कोटी रुपयांचे १४.२ किलो सोने आढळले. हे सोने जप्त करण्यात आले.



रान्याच्या घरातून २.६७ कोटींची रोख रक्कम (रोकड) आणि २.०६ कोटी रुपयांचे सोने जप्त केले. या व्यतिरिक्त घरातून तीन मोठे भरलेले खोके जप्त करण्यात आले. घरामधून एकूण १७.२९ कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली. यानंतर रान्याला चौकशीसाठी डीआरआयचे पथक नागवारा येथील कार्यालयात घेऊन गेले. डीआरआयच्या हाती आलेल्या माहितीनुसार रान्या वर्षभरात ३० वेळा दुबईला गेली. ती १५ दिवसांत चौथ्यांदा दुबईवरुन येत असल्याचे कळले तेव्हा कारवाई करण्याचा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण मागील काही काळापासून रान्याच्या हालचालींवर डीआरआयचे अधिकारी लक्ष ठेवून होते. प्रत्येकवेळी ती केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर पोलिसाच्या मदतीने तपासणी टाळून विमानतळावरुन बाहेर पडत होती. यामुळे रान्याने आतापर्यंत किती कोटी रुपयांची तस्करी केली आणि फक्त सोन्याची तस्करी केली आणि इतर वस्तूंचीही तस्करी केली याचा तपास सुरू आहे.



रान्याच्या तस्करीचा संबंध एका बड्या राजकीय नेत्याशी असल्याची चर्चा आहे. नेत्याच्या सूचनांनुसार सोन्याची तस्करी सुरू होती, असे समजते. या प्रकरणी संबंधित नेत्याचीही लवकरच डीआरआय चौकशी करण्याची शक्यता आहे.



सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपात रान्याला पकडण्यात आले. पण रान्याने वेगळाच दावा केला. मला सोन्याची तस्करी करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आले; असे रान्याने सांगितले. रान्याचे वडील आणि कर्नाटक पोलिसांच्या गृहनिर्माण विभागाचे महासंचालक डीजीपी रामचंद्र राव यांनी माहिती मिळताच धक्का बसला, अशी प्रतिक्रिया दिली. रान्याचे लग्न झाले आहे आणि मागील अनेक दिवसांपासून ती आमच्यासोबत नाही त्यामुळे तिनं नेमकं काय केलंय आणि का केलंय या विषयावर मला बोलता येणार नाही; असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

आकाशवाणीवरुन २६ मार्चपासून "वंदे मातरम्" राष्ट्रीय गीताची पूर्ण आवृत्तीचे प्रसारण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

नवी दिल्ली : पोटात संसर्ग झाल्याची तक्रार केल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मंगळवारी

पीएनजी आणि सीएनजी पुरवठ्यावर भर; भारताकडे पुरेसा इंधन साठा

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने बुधवारी देशातील पेट्रोलियम

एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगच्या अंतिम मुदतीत बदल झाल्याचे वृत्त केंद्र सरकारने फेटाळले

नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगच्या अंतिम मुदतीत बदल झाल्याबाबत सोशल मीडियावर पसरत असलेले वृत्त

सिंगापूर न्यायालयाने झुबीन गर्ग यांचा मृत्यू अपघाती ठरवला; कोणताही घातपात नसल्याचा निष्कर्ष

नवी दिल्ली : सिंगापूर कोरोनर कोर्टाने प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी आपला अंतिम निकाल

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली घसरल्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील शांततेच्या आशेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आज पुन्हा एकदा