
तब्बल २२ अनधिकृत,३० अतिक्रमण केलेल्या दुकानांवरही कारवाई
मुंबई : माटुंगा मध्य रेल्वे स्थानक परिसर आणि भांडारकर मार्गावरील फुल बाजार परिसरातील ५२ अनधिकृत दुकानांवर मुंबई महानगरपालिकेच्या एफ (उत्तर) विभागाच्या वतीने गुरुवारी ०६ मार्च २०२५ कारवाई करण्यात आली. यामध्ये अनधिकृत २२ दुकाने आणि अतिक्रमण केलेल्या ३० दुकांनाचा समावेश आहे.
उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, एफ (उत्तर) विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. माटुंगा रेल्वे स्थानक आणि भांडारकर मार्गावरील फुल बाजार परिसरात पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आले होते.

मुंबई : मुंबईत आता बाईक टॅक्सीला (Mumbai Bike Taxi) मंत्रालयाचा हिरवा कंदील मिळाला आहे. मुंबईत बाइक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची (Transport Ministry) परवानगी मिळाली आहे. ही ...
या पार्श्वभूमीवर, एफ (उत्तर) विभागाच्या वतीने निष्कासन मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत सुमारे ३०० मीटर परिसरातील अनधिकृत २२ दुकाने तसेच अतिक्रमण करण्यात आलेली ३० दुकाने निष्कासित करण्यात आली. परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी सुमारे १०५ मनुष्यबळासह २ जेसीबी व ६ डंपर आणि २ अन्य वाहने तैनात करण्यात आली होती. तसेच पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
महापालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त पदाची प्रथच सुत्रे हाती घेतल्यानंतर शुक्ला यांनी माटुंगा रेल्वे स्टेशन परिसरासह येथील भांडारकर मार्गावरील फुलबाजारातील गाळेधारकांना लक्ष्य केल्याने आता हे सहायक आयुक्त आता विभागातील कुठल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून लक्ष वेधून घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.