Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Bike Taxi : मुंबईकरांसाठी खुशखबर! बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाचा हिरवा कंदील

Mumbai Bike Taxi : मुंबईकरांसाठी खुशखबर! बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाचा हिरवा कंदील

मुंबई : मुंबईत आता बाईक टॅक्सीला (Mumbai Bike Taxi) मंत्रालयाचा हिरवा कंदील मिळाला आहे. मुंबईत बाइक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची (Transport Ministry) परवानगी मिळाली आहे. ही मुंबईकरांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीतून (Mumbai Traffic) प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील वाहतूक कोंडीवर विविध उपाय करण्यात येत आहे. कोस्टल रोड असो वा, जलमार्ग वाहतूक असो, मेट्रो अथवा भुयारी रेल्वेचा टप्पा असो, मुंबई थांबता कामा नये यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातच आता बाईक टॅक्सीचा (Mumbai Bike Taxi) नवीन मार्ग समोर आला आहे.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात राहणार्‍यांना मराठी भाषा आलीच पाहिजे! मुख्यमंत्री फडणवीसांचा रोखठोक अंदाज

या बाईक टॅक्सी प्रवासाकरीता एका किलोमीटरसाठी ३ रुपये भाडे हा दर ठरल्याची माहिती समोर येत आहे. बाईक टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा आवश्यक असेल. बाईकस्वाराच्या पाठी बसणाऱ्यास सुद्धा हेल्मेट बंधनकारक असणार आहे. बाईक टॅक्सी (Mumbai Bike Taxi) सेवा देणाऱ्या कंपनीकडे कमीतकमी ५० दुचाकी वाहने असणे आवश्यक आहे. या बाईकच्या नोंदणी क्रमाकांची (नंबर प्लेट) पाटी पिवळ्या रंगाची असेल. बाईक टॅक्सीमधील दुचाकीसाठी विशिष्ट रंग ठरवण्यात येणार आहे. बाईक टॅक्सी चालकाला बॅचची सक्ती असेल. हा बॅच परिवहन विभाग नोंदणी करून देईल. पोलीस पडताळणीत करूनच चालक परवाना बॅच मिळणार असल्याचे समोर येत आहे. महिलांसाठी खास महिला बाईक रायडर असावेत अशी सूचना संबंधित बाईक टॅक्सी (Mumbai Bike Taxi) सेवा देणार्या कंपनीस देण्यात येतील. ओला, उबेरच्या धरतीवर बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागणार नाही. मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

मुंबईत यापूर्वी रॅपिडोने सेवा सुरू केली होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद ही मिळाला. पण टॅक्सी आणि ऑटो चालकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. याविषयीचे शासन दरबारी कोणतेही धोरण नव्हते. त्यामुळे ही सेवा बंद झाली होती. आता ही सेवा पुन्हा सुरू होणार आहे. तर बाईक टॅक्सीमध्ये (Mumbai Bike Taxi) महिला सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. बाईक चालकाला पाठीमागे प्रवाशी बसवताना बाईकच्या मध्यभागी पार्टिशन लावणे बंधनकारक असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -