Friday, March 28, 2025
Homeक्रीडाचॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव, स्टीव्ह स्मिथ निवृत्त

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव, स्टीव्ह स्मिथ निवृत्त

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. भारताने सामना चार गडी राखून जिंकला. या विजयामुळे भारत अंतिम फेरीत पोहोचला तर ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपले. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. स्मिथ एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय टी २० सामने खेळणार आहे.

Champions Trophy 2025: भारताच्या विजयाने रोहितच्या नावावर ऐतिहासिक रेकॉर्ड, धोनी-विराटला टाकले मागे

क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला आहे. यामुळे २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची स्टीव्ह स्मिथची इच्छा आहे, तसे सूतोवाच त्याने केले आहे. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी एकदिवसीय क्रिकेटमधून स्टीव्ह स्मिथने निवृत्ती घेतल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियाचा संघ आता २०२७ च्या एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषकासाठी संघ बांधणी करणार आहे. या संघात तरुण खेळाडूंना प्राधान्य द्यायचे आहे. ही बाब विचारात घेतल्यानंतरच निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे स्टीव्ह स्मिथने सांगितले. टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची तयारी करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे, असेही स्टीव्ह स्मिथने सांगितले.

ICC Champions Trophy 2025 : पराभवाचा बदला घेतला, कांगारूंना हरवत भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

स्टीव्ह स्मिथ २ जून २०२५ रोजी ३६ वर्षांचा होणार आहे. त्याने १९ फेब्रुवारी २०१० रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर वेस्ट इंडिज विरोधात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात फिरकीपटू म्हणून प्रभावी गोलंदाजी करत त्याने दोन बळी घेतले होते. स्टीव्ह स्मिथ ४ मार्च २०२५ रोजी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. भारताविरुद्धच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. या सामन्यात त्याने ९६ चेंडूत ७३ धावांची खेळी केली.

उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने १७० एकदिवसीय सामने खेळून ४३.२८ च्या सरासरीने ५८०० धावा केल्या. यात १२ शतके आणि ३५ अर्धशतके यांचा समावेश आहे. स्मिथने एका सामन्यात १६४ धावा केल्या. ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. गोलंदाज म्हणून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०७६ चेंडू टाकून ३४.६७ च्या सरासरीने २८ बळी घेतले. फक्त १६ धावा देऊन तीन बळी ही त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. क्षेत्ररक्षक म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने तब्बल ९० झेल घेतले आहेत.

स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने २०१५ आणि २०२३ मधील एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक तसेच २०२१ चा टी २० विश्वचषक आणि २०२१ – २३ टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे. या व्यक्तिरिक्त त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया २०१० च्या टी २० विश्वचषकाची उपविजेती झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -