मुंबई: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सेमीफायनलमध्ये दमदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला हरवले. टीम इंडियाने दुबईत खेळवण्यात आलेल्या सामन्यात ४ विकेटनी विजय मिळवला. यासोबतच भारत फायनलमध्ये पोहोचला आहे. संघाच्या विजयासोबत कर्णधार रोहित शर्माच्या नावावर खास रेकॉर्ड झाला. त्याने इतिहास रचला आहे. रोहित आयसीसीच्या चार स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला कर्णधार ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना २६४ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४८.१ षटकांत ६ विकेट गमावत हे लक्ष्य पूर्ण करत सामना जिंकला. विराट कोहलीने कमालीची फलंदाजी केली. कोहलीने ९८ बॉलचा सामना करताना ८४ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यरने ४५ धावांची खेळी केली. लोकेश राहुल ४२ धावांवर नाबाद राहिला. भारताने हा सामना ४ विकेट राखत जिंकला.
याबाबतीत रोहित धोनी-विराटच्या पुढे
रोहित चार आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला कर्णधार ठरला आहे. त्याने याबाबतीत महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीलाही मागे टाकले. भारताने धोनीच्या नेतृत्वात तीन महत्त्वाचे खिताब जिंकले होते. मात्र धोनीच्या नेतृत्वात संघाला चार स्पर्धांच्या फायनलमध्ये खेळता आले नव्हते. भारताने धोनीच्या नेतृत्वात टी-२० वर्ल्डकप २००७, वनडे वर्ल्डकप २०११ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३मधील जेतेपद जिंकले होते.
रोहितच्या नेतृत्वात खेळले हे फायनल सामने
भारताने रोहितच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३मध्ये स्थान मिळवले होते. येथे ऑस्ट्रेलियाने त्यांना २०९ धावांनी हरवले होते. यानंतर ते वनडे वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये पोहोचले. येथेही त्यांना ऑस्ट्रेलियाने हरवले होते. भारताने रोहितच्या नेतृत्वात टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये फायनलमध्ये स्थान मइळवले. हा खिताब टीम इंडियाने जिंकला. त्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या फायनलमध्ये ते पोहोचले आहेत.