Sunday, March 16, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वपोकोचा गेमिंग, रील्स, सोशल मीडिया, सेल्फी, फोटोसाठी उपयुक्त ५जी स्मार्टफोन ९९९९ रुपयांत

पोकोचा गेमिंग, रील्स, सोशल मीडिया, सेल्फी, फोटोसाठी उपयुक्त ५जी स्मार्टफोन ९९९९ रुपयांत

मुंबई : पोकोने गेमिंग, रील्स, सोशल मीडिया, सेल्फी, फोटोसाठी उपयुक्त ५जी स्मार्टफोन ९९९९ रुपयांत उपलब्ध करुन दिला आहे. पोको एम७ ५जी त्‍याच्‍या सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.८८ इंच डिस्‍प्‍ले, तसेच अल्‍ट्रा-स्‍मूद १२० हर्ट्झ अॅडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट असलेला एकमेव स्‍मार्टफोन आहे. मनसोक्‍त मनोरंजनाचा, गेमिंगचा किंवा ब्राउजिंगचा आनंद घ्‍यायचा असो पोको एम७ ५जी सर्वोत्तम, डोळ्यांसाठी अनुकूल वापराचा अनुभव देतो. स्‍नॅपड्रॅगन® ४ जेन २ चिपसेटची शक्‍ती, १२ जीबी रॅम (६ जीबी टर्बो रॅम) आणि ५१६० एमएएच बॅटरी असलेला हा स्‍मार्टफोन दीर्घकाळापर्यंत डिवाईसचा वापर करणाऱ्या वापरकर्त्‍यांसाठी सुलभ, विनाव्‍यत्‍यय कार्यक्षमता देतो.तसेच ५० मेगापिक्‍सल सोनी सेन्‍सर अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्ट व आकर्षक फोटो क्षमता उपलब्ध करुन देतो. सोप्या शब्दात सांगायचे तर पोको एम७ ५जी वाजवी दरात उल्लेखनीय अशी कार्यक्षमता, आकर्षक डिस्‍प्‍ले आणि पॉवर-पॅक कॅमेरा देतो, असे पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्‍हणाले.

Cyber Crime : सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ!

पोको एम७ ५जीची प्रमुख वैशिष्ट्ये :

  1. स्‍नॅपड्रॅगन ४ जेन २ + १२ जीबी रॅम – भारतातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह गेमिंग, एडिटिंगचा आनंद घ्‍या आणि दैनंदिन टास्‍क्‍स करा.
  2. सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.८८ इंच डिस्प्‍ले – टीयूव्‍ही ऱ्हेनलँड ट्रिपल आय प्रोटेक्‍शनसह श्रेणीमधील सर्वात मोठ्या डिस्‍प्‍लेसह चित्रपट, रील्‍स आणि गेम्‍सचा अभूतपूर्व आनंद घ्‍या.
  3. ५० मेगापिक्‍सल सोनी सेन्‍सर – अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍ट व आकर्षक फोटो कॅप्‍चर करतो.
  4. ५१६० एमएएच बॅटरी + १८ वॅट फास्‍ट चार्जिंग (३३ वॅट इन-बॉक्‍स चार्जर) – दिवसभर बॅटरी कार्यरत राहते, तसेच काही मिनिटांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते.
  5. नेक्‍स्‍ट जनरेशनसाठी डिझाइन करण्‍यात आलेला डिवाईस – अत्‍यंत किफायतशीर किमतीत जलद, फ्यूचर-रेडी ५जी कनेक्‍टीव्हिटी.

पोको एम७ ५जी अद्वितीय दरामध्‍ये लाँच करण्‍यात आला आहे. फक्‍त ९,९९९ रूपयांमध्‍ये ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍ट, १०,९९९ रूपयांमध्‍ये ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍ट खरेदी करा – पहिल्‍या दिवसाच्‍या विक्रीसाठी स्‍पेशल किंमत. फक्‍त पहिल्‍या दिवशी वरील स्‍पेशल किमतींचा लाभ घ्‍या, पोको एम७ ५जी ची विक्री ७ मार्च दुपारी १२ वाजल्‍यापासून फक्‍त फ्लिपकार्टवर सुरू होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -