Kedarnath ला जाण्याचा प्लान करताय? ९ तासांचा प्रवास आता फक्त ३६ मिनिटांत

नवी दिल्ली: हिंदुंच्या पवित्र ४ धाममधील महत्वाचे धाम असलेल्या केदारनाथ येथे जाण्यासाठी रोप वे बनवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.


यासंदर्भात वैष्णव म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय रोप वे विकास कार्यक्रमांच्या पर्वतमाला परियोजनेअंतर्गत उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यानच्या १२.९ किलोमीटर लांबीच्या रोप वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलीय. या रोप-वेचा मोठा फायदा होणार असून यामुळे ८ ते ९ तासांचा प्रवास ३६ मिनीटात होईल. विशेष म्हणजे या रोप-वे कारमध्ये ३६ लोक बसण्याची क्षमता असेल. एकूण १२.९ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा खर्च ४ हजार ८१ कोटी रुपये असून त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.



दररोज १८ हजार प्रवाशांना घेऊन जाणार रोप वे


उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यानच्या या रोपवेची क्षमता १८०० प्रवासी प्रति तास असणार आहे. यामुळे दर दिवशी तब्बल १८ हजार प्रवासी रोप वेने प्रवास करू शकतात.



वर्षभर उपलब्ध होणार रोजगार


रोपवेमुळे हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल, फूड तसेच पर्यटन यासारख्या उद्योगांना संपूर्ण वर्षात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे दळवळणाला अधिक प्रोत्साहन मिळेल तसेच आर्थिक विकासाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असेल.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

राज्यपालांचा सभागृहातून सभात्याग नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण नवी दिल्ली :