गर्भवती पत्नीला पतीनेच निर्घृणपणे संपवले

  75

नाशिक : नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात एक हत्येची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आलं आहे. यात चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पतीने 19 वर्षीय गर्भवती पत्नीचा खून (Crime News) केल्याची घटना घडलीय. पतीने पत्नीचा गळा आवळून खून करत मृतदेह गंगापूर रोडवरील शहीद अरुण चित्ते पुलाजवळील नदीकिनारी फेकून दिलाय.


दरम्यान, पतीने पोलिसात पत्नी हरवल्याची माहिती दिली असता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कसून तपास केला. अखेर या प्रकरणात तपासाचे चक्र गतिमान करत पोलिसांनी पतीचे बिंग फोडत आरोपीला अटक केली आहे.



पुढे आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विकी रॉय यादव या वीस वर्षीय पतीला ताब्यात घेतले आहे. चारित्र्याच्या संशय व विवाहात सासऱ्यांनी काहीही न दिल्याने माहेरून पैसे आणावे यासाठी पत्नीचा छळ सुरू होता. अशातच, सततच्या भांडणानंतर पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची कबुली देखील आरोपीने दिली आहे.


अमृता कुमारी यादव ही मूळ नेपाळमधील असल्याची देखील माहिती समोर आली आहे. नाशिक तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा न्यायालयात आरोपीला दाखल केले असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आमले यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Vastu Tips : घरात या दिशेला ठेवा तिजोरी, धन-समृद्धीची होईल वाढ!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी एक विशिष्ट दिशा ठरलेली आहे. योग्य दिशेला ठेवलेल्या

Vastu Tips: सायंकाळी किंवा रात्री दान करू नयेत या गोष्टी, अन्यथा देवी लक्ष्मी होते नाराज!

मुंबई : हिंदू धर्मग्रंथ आणि वास्तुशास्त्रानुसार, काही विशिष्ट गोष्टी सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी दान

दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप

मुंबई : दीड दिवसांच्या गणरायांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. गणरायाच्या निरोपाला रिमझिम पावसाच्या सरी

डॉकयार्ड रेल्वे स्टेशन तरुण मृतदेह प्रकरणी तिघांना अटक

मुंबई (प्रतिनिधी) : डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळील माझगाव परिसरात मंगळवारी एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी

मुस्लिम असल्याने मला ट्रोल करतात : शमी

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अगामी आशिया चषकासाठी निवड न झाल्याबद्दल