Sunday, July 6, 2025

अशा आमदारांचे करायचे काय? विधानसभेत पान खाऊन मारली पिचकारी; अध्यक्षांनी सुनावले खडेबोल!

अशा आमदारांचे करायचे काय? विधानसभेत पान खाऊन मारली पिचकारी; अध्यक्षांनी सुनावले खडेबोल!

लखनऊ : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज (४ फेब्रुवारी) सकाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले आणि विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी विधानसभेत घडलेल्या एका प्रकारावरून चांगलाच संताप व्यक्त केला.


उत्तर प्रदेश विधानसभेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका आमदाराने सभागृहात पान मसाला खाऊन पिचकारी मारल्याचा प्रकार घडला. या अनुशासनभंगावर विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित आमदाराला खडसावले आहे.


विधानसभा अध्यक्षांनी हा प्रकार अत्यंत अनुचित असल्याचे सांगत स्पष्ट केले की, सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्या आमदाराची ओळख पटली आहे. मात्र, सभागृहात कोणाचाही सार्वजनिक अपमान होऊ नये म्हणून त्यांनी थेट नाव घेणे टाळले. "अशा वर्तनामुळे विधानसभेच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो. सर्व सदस्यांनी जबाबदारीने वागावे," असे त्यांनी ठणकावून सांगितले.





महानांनी पुढे सांगितले की, संबंधित आमदाराने स्वतःहून त्यांची भेट घेतली तर ते योग्य होईल; अन्यथा त्यांना बोलवावे लागेल. त्यांनी इतर आमदारांनाही अशा अनुशासनहीन वागणुकीला थांबवण्याचे आवाहन केले. या घटनेनंतर विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त करत विधानसभेतील शिस्तभंगावर सवाल उपस्थित केला आहे.


दरम्यान, या प्रकारावरून त्या संबंधित आमदारावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा