त्र्यंबकेश्वर : त्रंबकेश्वर येथे एक दिवसाआड पाणीपुरवठा त्रिंबक नगर परिषदेने मार्चपासून सुरू केला आहे. त्रंबकेश्वर मध्ये मे महिन्यात मोठी पाणीटंचाई जाणवते हे लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन लक्षात घेऊन व वाढता उन्हाळा लक्षात घेऊन नगरपालिकेने यंदा मार्च महिन्यापासूनच पाणी कपात सुरू केली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. नगरपालिका पाणीपुरवठा विभागातून वरील माहिती देण्यात आली. (Water Shortage)
ज्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये असलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये पडणाऱ्या पावसाने मुंबई ठाणे मराठवाडा नाशिक नगर सह अन्य काही भागांमध्ये पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे त्याच त्र्यंबक नगरीमध्ये पाण्याची टंचाई जाणू लागली आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आता एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे भविष्यामध्ये पाणी पुरले पाहिजे या दृष्टिकोनातून ही पावलं उचलली जात असल्याचे नगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले जात असले तरी देखील त्र्यंबकेश्वरला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणीसाठा कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे त्यामुळेच पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.दरम्यान मार्च मार्च एंड लक्षात घेऊन नागरिकांनी थकीत व चालू घरपट्टी पाणीपट्टी वेळेत भरून सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या कर विभागाने वसुली विभागाने पाणीपट्टी विभागाने केले आहे. एप्रिल मे अखेर अथवा पाऊस लांबल्यास दोन दिवसाआड पाणीपुरवठा देखील होऊ शकतो. १८ ते २० हजार लोक वस्तीसाठी ही स्थिती आहे. तर दुसरीकडे भव्य दिव्य सिंहस्थ कुंभमेळ्याची स्वप्न रंगवली जात आहे.
कुंभमेळ्यासाठी गौतमी गोदावरी धरणातून ज्यादा पाणी उचलण्याची योजना होणार आहे. नियोजन आहे. पण ती पुरेशी होईल काय ? अशी देखील नागरिकांना काळजी पडला आहे. थोडक्यात गोदावरीच्या उगमस्थानला तहान लागली आहे.