मुंबई: वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) सकाळी उठताच काही खास गोष्टी दिसणे अतिशय शुभ असते. यामुळे तुमचा दिवस मंगलमय जाईल असे संकेत देतात. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठताच काही दिसणे शुभ असते.
वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) जर सकाळी उठताच तुमच्या उजव्या हाताला खाज येत असेल तर समजून जा की तुम्हाला अचानक धन प्राप्ती होणार आहे. सकाळी उठताच उजव्या हाताला खाज येत असेल तर अडकलेले पैसे पुन्हा परत मिळू शकतात. तसेच कमाईचे नवे स्त्रोत मिळतात.
पक्ष्यांचा किलबिलाट
वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) जर तुम्हाला सकाळीच कानांमध्ये चिमणी, पोपट, कोकिळा अथवा कबूतर यांचा आवाज ऐकू येत असेल तर तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येणार आहे.
दरवाजावर गाय येणे
वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) सकाळी सकाळी गाय मुख्य दारावर येणे शुभ मानले जाते.यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होण्याचे संकेत देतात. अशी मान्यता आहे की गायीमध्ये ३३ कोटी देवी-देवतांचा वास असतो. यामुळे जेव्हा मुख्य दरवाजावर गाय आली तर हात जोडून नमस्कार करा.
शुभ वार्ता
वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) जर सकाळी सकाळी डोळे उघडताच तुम्हाला चांगली बातमी ऐकू आली तर तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. हे शुभ संकेत असू शकतात.