Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीOLA Electric layoffs : ओला इलेक्ट्रिक कंपनी १००० कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता!

OLA Electric layoffs : ओला इलेक्ट्रिक कंपनी १००० कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता!

बंगळूरु : भाविश अग्रवाल यांनी स्थापन केलेली भारतीय इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी गेल्या काही आठवड्यांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. पाच महिन्यांपूर्वी या कंपनीने कंपनीने नोकरकपात जारी केली होती. यामध्ये सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकले होते. त्यानंतर आता पुन्हा ओला इलेक्ट्रिक (OLA Electric) कंपनीने नोकरकपात काढली असून १००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय (OLA Electric layoffs) घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Ashish Chanchlani : ‘परिस्थितीशी लढू, तुम्ही मला पाठींबा द्या’; आशिष चंचलानीची अश्रू ढाळत चाहत्यांकडे विनंती!

मिळालेल्या माहितीनुसार, ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये देखील मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळालं होते. या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कंपनी विविध पदांवरील जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून तोटा कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कंपनीकडे सध्या जवळपास ४००० कर्मचारी आहेत. त्यापैकी २५ टक्के कर्मचाऱ्यांना ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीमधून घरी पाठवले जाऊ शकते. (OLA Electric layoffs)

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे प्रमुख भवीश अग्रवाल यांच्याकडून नोव्हेंबर २०२४ पासून पुनर्रचना योजना सुरु करण्यात आली होती. त्यानुसार कंपनीत विविध पदांवर काम करणाऱ्या कामगारांना कामावरुन कमी केलं जाऊ शकतं. ओलाकडून अद्याप किती कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाईल, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, कंपनीच्या प्रवक्त्यांनी फेररचना केल्यानं ग्राहक सेवांमध्ये सुधारणा झाल्याचं म्हटलं. याशिवाय उत्पादन वाढवण्यासाठी ज्या गरजेच्या नसलेल्या पदांना रद्द करण्यात आलं आहे. (OLA Electric layoffs)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -