मुंबई : कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (Indias Got Latent) या शोमध्ये रणवीर अलाहबादियाने (Ranveer Allahbadia) केलेल्या वक्तव्यावरून सगळीकडेच त्याच्यावर टीका होत आहे. तसेच या कार्यक्रमात सहभागी असणारे सर्व युट्यूबरसह इनफ्यूएनसर देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यामध्ये युट्यूबर आशिष चंचलानीचा (Ashish Chanchlani) देखील समावेश असून समय रैना आणि रणवीर यांच्यावर होणाऱ्या टीकेचा परिणाम आशिष चंचलानीवर होत आहे. त्यातच आता आशिषने सोशल मीडियावर इमोशनल व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहावं अशी मागणी केली आहे.
“नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी तुमचे मेसेज वाचले… मी विचार केला होता की मी तुमच्याशी त्याबद्दल बोलायला जाईन, पण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा काय बोलावे ते मला समजत नाहीये. मी या परिस्थितीशी लढेन, मी इतके कठीण काळ पाहिले आहेत, मला यातूनही काहीतरी नवीन शिकायला मिळेल. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की मला आणि माझ्या कुटुंबाला तुमच्या प्रार्थनेत ठेवा. आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा मी परत येईन, माझे काम थोडे बदलले आहे, पण जेव्हा परत काम सुरु करेन तेव्हा कृपया मला साथ द्या. आपण कठोर परिश्रम करू, मी नेहमीच कठोर परिश्रम केले आहेत,” असे आशिषने (Ashish Chanchlani) व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आशिषच्या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी ‘तुझी काहीही चूक नव्हती’ , तू टायगर आहेस. आम्ही कायमच तुझ्या सोबत आहोत.’ अशा कमेंट्स करत त्याला पाठिंबा दिला आहे. (Ashish Chanchlani)
View this post on Instagram