Kalyan : मेल एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशांच्या किंमती ऐवज चोरणारा चोरटा जेरबंद

एका चोराला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या


कल्याण : मेल एक्स्प्रेस मध्ये झोपलेल्या महिला प्रवाशांचा किंमती ऐवज चोरणाऱ्या एका चोराला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रेल्वे प्रवासामध्ये प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना कल्याण,वसई दरम्यान वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठाच्या मार्गदर्शन खाली गुन्हे शाखा युनिट-तीन, कल्याण,लोहमार्ग,मुंबई पथकाने तपास सुरू केला. त्यानुसार कल्याणात रेल्वे चोरी प्रकरणी रेकॉर्ड वर असलेला गुन्हेगार येणार असल्याची खबर रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांना मिळाली.


मंगळवार १८फेब्रुवारी रोजी पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचित चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपी अरूण घाग ऊर्फ विकी, वय ३२ वर्षे, राह - चेंबूर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता, दिनांक २८जानेवारी रोजी इदौर दौड एक्सप्रेस गाडी गाडीतून प्रवास करीत असताना महिलेचा किंमती ऐवज असलेली लेडीज पर्स चोरी झाल्याबाबत कल्याण रे.पो.ठाण्यात दाखल झाला होता. हा गुन्हा अरूण याने केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्याला या गुन्हयात अटक करण्यात येवून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आले.



पोलीस कस्टडीत असताना त्याने सदर गुन्हयासह एकूण तीन गुन्हे केल्याची कबूली दिली असून,गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे दागिने झवेरी बाजार मुंबई येथील दोन सोनार तानाजी माने आणि नितीन येळे,मुंबई यांना विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्या अनुशंगाने त्यांना गुन्हयात अटक करून त्यांच्याकडून गुन्हयातील चोरी केलेल्या दागिन्यापासून बनविलेल्या सोन्याच्या लगडी,मोबाईल फोन व रोख रक्कम हस्तगत करून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कामगिरी लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे,पोलीस उपआयुक्त मनोज पाटील, सहा.


पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शन व सूचनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर,व.पो.निरीक्षक रोहीत सावंत,गुन्हे शाखा,लोहमार्ग,मुंबई यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा,कल्याण युनिट येथील सपोनि अभिजित टेलर,पो.उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, सपोउपनिरी संदिप गायकवाड,रविंद्र दरेकर,पोलीस अंमलदार लक्ष्मण वळकुंडे,अजय रौंधळ,राम जाधव,प्रमोद दिघे,रविंद्र ठाकुर,वैभव जाधव, हितेश नाईक, स्मीता वसावे, पदमा केंजळ, अक्षय चव्हाण, रुपेश निकम, सुनिल मागाडे, तांत्रिक शाखेचे सपोनिरीक्षक मंगेश खाडे, पोहवा विक्रम चावरेकर, संदेश कोंडाळकर, पोशि अमोल अहिनवे यांनी केला असुन, या गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा वळकुंडे करीत आहेत.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

शिक्षकांसह मुख्याध्यापकाकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे शौर्यची आत्महत्या

शिक्षण व्यवस्थेतील मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत नवी दिल्ली (वृत्तसंस्था): प्राचार्या आणि

नेपाळमध्ये पुन्हा पेटलं जेन झी चं आंदोलन

काठमांडू : नेपाळमध्ये पुन्हा जेन झी आंदोलन पेटलं आहे. देशातील तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. परिस्थिती

शाहिन, मुझम्मिलने बॉम्बसाठी ‘अल-फलाह’तून चोरले केमिकल

नवी दिल्ली : बॉम्ब बनवण्यासाठी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून रसायने चोरली होती, असा कबुली जबाब फरिदाबादच्या

मालेगावच्या बालिकेवर अत्याचार, सर्वत्र संताप; अभिनेत्री सुरभी भावेकडून कठोर शिक्षेची मागणी

मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन

राज्यभरातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला लाक्षणिक बंद

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरातील व्यापारी विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी