
पुणे : काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. न्यायालयात पक्षकारांची बाजू मांडणारे वकील मात्र याला अपवाद ठरतात. आपल्या पेशाची ओळख सांभाळण्यासाठी दिवसभर त्यांना काळ्या कोटातच वावरावे लागते. तरीही वकिलांना उन्हाळ्यात काळात कोटाचा त्रास होऊ नये, यासाठी दरवर्षी १५ मार्च ते ३० जून या तीन महिन्याच्या कालावधीत काळा कोट न वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.

दापोली : कोकणातील काजू उद्योगाचे पुनरुज्जीवन करणे तसेच काजू प्रक्रियादार, उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी आणि कोकणात रोजगाराच्या संधी वाढण्यासाठी ...
मात्र, यंदा उन्हाच्या वाढत्या झळांमुळे १५ दिवस आधीच १ मार्चपासून ही मूभा देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सिव्हिल मॅन्युअलच्या प्रकरण २२ मधील परिच्छेद ६३६ नुसार वकिलांना कोट वापरास सूट देण्यात आली आहे. त्यानुसार, येत्या ३० जूनपर्यंत न्यायालयीने कामकाजात काळ्या कोटचा वापर ऐच्छिक असणार आहे.