Nalasopara News : भावानेच घेतला चिमुकल्या बहिणीचा जीव

मुंबई : सर्व नातेवाईक आपल्या बहिणीचेच लाड करतात. याचा राग डोक्यात घालून एका अल्पवयीन मुलाने स्वतःच्या ५ वर्षीय बहिणीचा गळा दाबून डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. नालासोपाऱ्यात घडलेला हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.


'तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना' या ओळीला भाऊ बहिणीचं नातं छान शोभतं. भावंडांच्या नात्यात कितीही भांडण झाली तरी पुन्हा काही वेळाने गट्टी जमतेच. मात्र नालासोपाऱ्यात एका अल्पवयीन मुलाने आपल्या बहिणीचा जीव घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, श्री राम नगर परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलाने सर्व नातेवाईक आपल्या बहिणीचेच लाड करतात हा राग डोक्यात घालून स्वतःच्या ५ वर्षीय बहिणीला डोंगरावर नेले तिथेच त्याने बहिणीचा गळा दाबून डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. मृत मुलगी खूप वेळ घरात दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र मुलगी न सापडल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तपास केला असता मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना डोंगरावर मुलीचा मृतदेह आढळला. मात्र या चिमुकलीची कोणी आणि कशासाठी हत्या केली असेल याबद्दलचा काहीच पुरावा सापडत नव्हता.


अखेर ही चिमुकली शेवटची आरोपीसोबत दिसून आल्याने पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची कसून चौकशी केली. पोलिसांनी दिलेला दम, सतत विचारण्यात आलेल्या प्रश्नांसमोर या मुलाचा संयम सुटला आणि त्याने स्वतःच तिची हत्या केल्याची कबुली दिली. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून