Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २ मार्च ते ८ मार्च २०२५

Share

साप्ताहिक राशिभविष्य, २ मार्च ते ८ मार्च २०२५

सहकार्य मिळेल

मेष : हा कालावधी आपणास अत्यंत चांगला आहे. उद्योगातून आणि इतर धंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. नवीन संधी चालून येणार आहे. पालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. दूरचे प्रवास संभवतात. परीक्षेत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडणार आहे. कुटुंबाकडून आपणास सहकार्य मिळेल. कोणतीही विपरीत परिस्थिती समोर आली तरी आपण आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहात. कुटुंबामध्ये शुभवार्ता मिळतील. प्रगती होईल. कुटुंबामधील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येऊन त्यांना दिलासा मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील.

अपेक्षापूर्ती होईल

वृषभ : आपल्या अपेक्षेनुसार आपली कामे पार पाडण्यात यश मिळेल. अपेक्षापूर्ती होईल. बरेच दिवस एखादे महत्त्वाचे काम होण्याची आपण वाट पाहत होता असे कार्य पूर्ण झाल्यामुळे उत्साहात व आनंदात वृद्धी होईल. मात्र कोणत्याही बाबतीत अतिरेक टाळा. थोड्या संयमाने शत्रूवर विजय प्राप्त करता येईल. मानपानाचे प्रसंग येऊ शकतात. कुटुंब परिवारात सुवार्ता मिळून वैयक्तिक भाग्योदय होईल. अचानक धनलाभाचे योग व्यावसायिक पर्यायातून विशेष लाभ काही फायद्याचे सौदे हाती येतील. त्यानुसार नियोजन बदलावे लागेल. आयात-निर्यात व्यवसायापासून रिटेल व्यवसायिकांची वृद्धी होऊन नफ्याचे प्रमाण वाढेल.

कार्यमग्न राहा

मिथुन : इतर कोणाच्याही आश्वासनांवर विसंबून राहणे म्हणजे नुकसानीस आमंत्रण दिल्यासारखे होईल. स्वतःचे कार्य स्वतः पूर्ण करा. चालढकल नको. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी उपलब्ध होतील. नोकरी, व्यवसाय, धंद्यात अनुकूल परिस्थिती लाभेल, मात्र नोकरीच्या ठिकाणी राजकारण आणि गटबाजीपासून अलिप्त राहणे हिताचे ठरेल. आपल्या कामाविषयी विज्ञान अद्ययावत ठेवा. कार्यमग्न राहा. इतरांच्या बोलण्याला बळी पडू नका. नंतर मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहिली तरी आर्थिक गरज भासू शकते.

कष्टाचे फळ मिळेल

कर्क : नोकरी, व्यवसाय, धंद्यात अनुकूलता लाभेल. नोकरीमध्ये वेतनवृद्धी, पदोन्नती यासारख्या घटना होऊ शकतात. केलेल्या कामाचे घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. उत्पन्नात वृद्धी होऊन नोकरीतील अधिकार कक्षा रुंदावतील. पण त्याचबरोबर जबाबदाऱ्याही वाढतील. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत मानसन्मान मिळून अतिरिक्त कार्यभार सोपविला जाऊ शकतो. आपल्या अधिकार मर्यादेचे उल्लंघन करू नका. व्यवसाय, धंद्यात तेजी वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी होईल. व्यवसाय विस्ताराच्या योजना हाती येतील. स्पर्धकांवर मात करू शकाल. भागीदाराबरोबर मतभेद टाळणे इष्ट ठरेल.

उन्नती आणि प्रगती होईल

सिंह : काहीवेळा विरोधकांचे मुद्दे पटणारे नसले तरी वाद-विवाद वाढवू नका. ते हिताचे ठरेल. थोडे सबुरीने व संयमाने घ्या. तसेच कुटुंब परिवारात आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. समोरील व्यक्तीच्या मतास उचित प्राधान्य देणे श्रेयस्कर ठरेल. सर्वच क्षेत्रातील समस्या जाणून घेतल्यास त्यावर मार्ग काढू शकाल. आपल्या कार्यक्षेत्रात उन्नती आणि प्रगती होईल. जीवन साथीचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कोणत्याही स्वरूपाच्या लहान-मोठ्या कार्यात यश मिळण्यासाठी ग्रहमान तसेच वातावरण अनुकूल आहे.

कामे गतिशील होतील

कन्या : अनुकूल कालावधी. हातात घेतलेल्या कार्यात यश. दीर्घकाळ रखडलेली जमीन-जुमला, स्थायी संपत्ती याविषयीची कामे गतिशील होतील. आर्थिक फायदा होऊ शकतो. आर्थिक बाजू चांगली राहिल्याने नवीन गुंतवणुकीचा विचार असेल; परंतु नवीन लहान-मोठी कोणतीही गुंतवणूक करताना सतर्क राहणे जरुरीचे. गरज पडल्यास त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घ्यायला विसरू नका. पूर्वी केलेल्या गुंतवणुका भरघोस फायदा मिळवून देतील. समारंभाची निमंत्रणे मिळतील.

बेरोजगारांना रोजगार मिळेल

तूळ : आपण आनंदी आणि उत्साही वातावरणाचा लाभ घेऊ शकाल. आर्थिक ओघ मोठा राहून आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. त्यामुळे मनसोक्त खर्चही करू शकाल. कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्याचे समाधान मिळेल. काही कार्यानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. प्रवास कार्य सिद्ध राहतील. जे जातक नोकरीच्या शोधात आहेत अशा जातकांचा नोकरीविषयक शोध संपुष्टात येईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील. शिक्षणासाठी परदेशगमन होऊ शकते.

सबुरीने घ्या

वृश्चिक : हितशत्रू यांच्यावरती या कालावधीमध्ये मात करू शकाल मात्र थोडा संयम आवश्यक आहे. सबुरीने घ्या. घाईगर्दीत कोणताही लहान-मोठा निर्णय घेण्याचे टाळा. तसेच स्वतःच्या क्रोधावर, वागण्यावर व बोलण्यावर नियंत्रण आवश्यक राहील. कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नका. समोरील व्यक्तीचे म्हणणे पूर्णपणे समजावून घेऊन नंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे हिताचे ठरेल. नेमकी संधी ओळखून आपली पुढील पावले उचला. कुटुंब परिवारातील परिस्थिती मतभेदांमुळे अस्थिर होण्याची शक्यता आहे.

सुख-सुविधांमध्ये वृद्धी

धनू :  सदरील कालावधीमध्ये आपल्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वृद्धी होईल. त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठा आणि यश कीर्ती वाढेल. राहत्या घरासाठी सुशोभीकरणासाठी खर्च होईल. व्यवसाय-धंद्यात मोठे करारमदार होऊन काही फायद्याचे सौदे हाती येण्याची शक्यता. व्यावसायिक उलाढाल वाढेल. जमीन-जुमला, स्थायी संपत्ती इत्यादींच्या खरेदी विक्रीतून लाभ. मात्र वादविवाद टाळा. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळू शकतो. कुटुंब परिवारात लग्नकार्य ठरतील.

महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात

मकर : या काळात जरी आपल्याला मिश्र फळे मिळणार असतील तरी आपल्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. आपल्या समोरील मोठी क्लिष्ट स्वरूपाची कार्य आपण आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर पूर्ण करू शकाल. भूमी भवन, प्रॉपर्टी यांच्यापासून मोठ्या आर्थिक लाभाची शक्यता. वैद्यकीय आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित जातकांना मोठ्या स्वरूपातील फायद्याचे सौदे हाती येण्याच्या शक्यतेसह नवीन नवीन संधी उपलब्ध होतील.आपल्या भावंडांच्यामुळे आपल्या कारकिर्दीमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात. विद्यार्थी स्पर्धात्मक यश मिळवू शकतात. मानसन्मान वाढेल.

अधिक परिश्रमाची आवश्यकता

कुंभ : आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक. पथ्यपाणी सांभाळा. त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात प्रेमसंबंध दृष्टिकोन बदलाची शक्यता. मतभेद, वादविवाद यापासून अलिप्त राहा. आपल्या समोरील कार्य पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रमाची आवश्यकता. आपल्या क्रोधावर वेळीच नियंत्रण ठेवा. मनस्वास्थ्य बिघडवणारा घटना घटित होऊ शकतात. बौद्धिक क्षेत्रातील जातकांना अनुकूल कालावधी घेतलेल्या कष्टाचे अपेक्षित फळ मिळू शकते. नोकरीत केलेल्या कामाचे चीज होईल. उत्पन्नात वृद्धी होण्याची शक्यता. एखाद्या प्रशिक्षणासाठी परदेशगमनाची संधी उपलब्ध होईल.

नवे अनुबंध जुळून येतील

मीन : सुरुवातीला रोजच्या जीवनात अनपेक्षित घटना घटित झाल्यामुळे आपल्या जीवनक्रमामध्ये बदल घडू शकतो. मनात गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पूर्ण विचाराअंती व शांत चित्ताने आपल्या समोरील परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणे योग्य ठरेल. यशप्राप्ती होईल. सभेच्या वेळी वादविवाद नको. व्यवसायिक उलाढाल वाढेल. तिचा अनुभव घेता येईल. उत्सव प्रदर्शन यशस्वी होऊन व्यवसायिक जुने संबंध नव्याने प्रस्थापित होतील. नवे अनुबंध जुळून येतील. नव्या संधींची उपलब्धता शेअर मार्केट तसेच तेजी-मंदी संबंधित व्यवसायातून आर्थिक फायदा होऊ शकतो.

Recent Posts

वानखेडेवर धक्कादायक घटना, चोरांनी मारला डल्ला आणि न्यायदंडाधिकाऱ्यांना बसला फटका

मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…

10 minutes ago

Shah Rukh Khan Wife Troll : शाहरूख खानच्या पत्नीच्या कपड्यांना बघून भडकले चाहते

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…

2 hours ago

Gaurav More: ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरेचं स्वप्न पूर्ण; ही महागडी गाडी घेतली

मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…

2 hours ago

Breaking News : मुख्यमंत्र्यांना जायचं होतं दिल्लीला पण उतरले…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…

2 hours ago

आईस्क्रीम कारखान्यातील धक्कादायक घटना, कामगारांना दिली अशी वागणूक की प्राणीही घाबरावेत !

छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…

3 hours ago

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

4 hours ago