दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीतील शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळत असलेल्या भारताला सुरुवातीलाच तीन मोठे धक्के बसले. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडने शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली या आघाडीच्या फलंदाजांना अवघ्या ३० धावांत बाद केले.
उपांत्य फेरीत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार की दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ते आज ठरणार
शुभमन गिल दोन धावा करुन मॅट हेन्रीच्या चेंडूवर पायचीत झाला. रोहित शर्मा १५ धावा करुन जेमीसनच्या चेंडूवर विल यंगकडे झेल देऊन परतला. विराट कोहली ११ धावा करुन मॅट हेन्रीच्या चेंडूवर ग्रेन फिलिप्सकडे झेल देऊन परतला. याआधी भारत सलग १३ व्यांदा नाणेफेक हरला. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया सलग दहाव्यांदा नाणेफेक हरली. नाणेफेकीचा कौल विरोधात न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतासाठी घातक ठरले.
आघाडीचे फलंदाज बाद झाल्यामुळे टीम इंडियाची भिस्त आता मधल्या फळीवर आहे. चौथ्या विकेटसाठी सावध खेळी करत श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल ही जोडगोळी भारताच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. टीम इंडियाने २१ षटकांत तीन बाद ८४ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर ३२ आणि अक्षर पटेल २१ धावांवर खेळत आहे.