रोहतक : काँग्रेसचे लोकसभेतील खासदार राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेवेळी दिसलेल्या महिलेचा मृतदेह बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिलेल्या सुटकेसमध्ये आढळला. या प्रकरणी हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सांपला पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. सुटकेसमध्ये आढळलेला मृतदेह हिमानी नरवाल नावाच्या काँग्रेसच्या महिला सदस्याचा आहे.
पांढरा पंजाबी ड्रेस परिधान केलेल्या अवस्थेतला हिमानी नरवाल यांचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला. मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती. यामुळे सुटकेस जवळ जाताच पोलिसांना दुर्गंधी जाणवू लागली. मृतदेहाच्या मानेभोवती ओढणी गुंडाळलेली दिसली. यामुळे गळा ओढणीने आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Mumbai Crime : पाळण्याच्या दोरीने गळा आवळत जन्मदात्यानेच घेतला ४ महिन्यांच्या मुलीचा जीव!
हिमानीच्या वडिलांनी आठ वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आता हिमानीची हत्या झाली आहे. हिमानीची आई तिच्या भावासोबत दिल्लीत आहे, तिला घटनेची माहिती देण्यात आली आहे. काँग्रेसचे काम करत असलेली हिमानी रोहतकमध्ये भाड्याच्या घरात वास्तव्यास होती. हिमानीचा मृतदेह सोनीपतमधील बस स्टँड चौकाजवळ काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये आढळला.
जळगावातील धक्कादायक घटना, राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची काढली छेड
सोशल मीडियात हिमानीचा दोन दिवसांपूर्वीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत हिमानीच्या हातावर मेंदी दिसत आहे. यामुळे सोहळ्याच्या ठिकाणी काही घडले का याचा तपास पोलिसांनी प्राधान्याने सुरू केला आहे. इतर शक्यतांचीही तपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.