Friday, March 28, 2025
Homeक्राईमMumbai Crime : पाळण्याच्या दोरीने गळा आवळत जन्मदात्यानेच घेतला ४ महिन्यांच्या मुलीचा...

Mumbai Crime : पाळण्याच्या दोरीने गळा आवळत जन्मदात्यानेच घेतला ४ महिन्यांच्या मुलीचा जीव!

मुंबई : ‘मुलगी झाली, लक्ष्मी दारी आली’ असे म्हणत असलो तरीही अनेक ठिकाणी मुलगी जन्माला आल्याने अनेकांना त्याचा तिरस्कार वाटतो. घरी वंशाचा दिवा म्हणजेच मुलगा जन्माला यावा यासाठी अनेकजण प्रार्थना करतात. मात्र मुलगी जन्माला आल्यामुळे चिमुकलीचा जीव घेतला जाण्याच्या घटना घडल्याच्या समोर येतात. अशीच एक घटना स्मार्ट सिटी मानले जाणाऱ्या मुंबईत घडली आहे. मुलगी जन्माला आल्याच्या तिरस्काराने जन्मदात्र्यानेच पोटच्या मुलीचा जीव घेतला आहे.

Akola ST Bus : अकोल्यात धावती एसटी बस आगीच्या भक्ष्यस्थानी

मुंबईमधील घाटकोपरमध्ये बापाने मुलगी झाल्याच्या तिरस्कारातून पाळण्यातच अवघ्या चार महिन्यांच्या बाळाची दोरी आवळून ठार केल्याची संतापजनक घटना घडली. मृत बाळाची आई कामानिमित्त घराबाहेर गेल्याचं लक्षात येताच नराधम बापाने हे कृत्य केले. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली असून संजय बाबू कोकरे या नराधम बापाला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील घाटकोपरमधून संतापजनक घटना समोर आली आहे .मुलगी नको म्हणून नराधम बापाने अवघ्या चार महिन्यांच्या निष्पाप मुलीची पाळण्यातच गळा आवळून हत्या केली .घाटकोपरच्या कामराज नगर भागात संजय बाबू कोकरे या नराधम बापाला पंतनगर पोलिसांनी अटक केली . काल शनिवारी (१ मार्च) बाळाची आई काही वेळ कामानिमित्त घराबाहेर गेल्याचे लक्षात येताच संधीचा फायदा घेत संजय कोकरेने  पाळण्याच्या दोरीने आपल्या मुलीचा गळा घोटून तिला पाळण्यातच संपवले .काही वेळानंतर आई घरी परतल्यानंतर बाळ हालचाल करत नसल्याचं तिला लक्षात आलं .तिने आरडा ओरड केल्यानंतर हा प्रकार समोर आला . पोलिसांना ही बातमी कळताच घटनास्थळी धाव घेत पंतनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -