नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर होऊन स्वतःची बाजू मांडावी. जामीन हवा असेल तर आधी स्वतःचे म्हणणे मांडा नंतर जामीन अर्जावर विचार करता येईल; असे नाशिकच्या कोर्टाने सुनावले. यामुळे काँग्रेसचे लोकसभा खासदार राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात हजर व्हावे लागणार आहे. नाशिकच्या कोर्टाने पुढील सुनावणी ९ मे रोजी ठेवली आहे. या सुनावणीवेळी राहुल यांना नाशिकच्या कोर्टात हजर व्हावे लागणार आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार, महिला सुरक्षेचा मुद्दा गाजणार
राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. राजकीय हेतूने काढलेल्या या यात्रेत वर्धा येथे राहुल यांची सभा झाली. या सभेत बोलताना राहुल यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी सावरकरप्रेमी देवेंद् भुतडा यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत नाशिकच्या फौजदारी कोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली त्यावेळी राहुल यांच्यावतीने जयंत जायभावे आणि आकाश छाजेड यांनी युक्तिवाद केला. सुनावणीवेळी राहुल यांच्यावतीने जामीन मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला. या अर्जावर विचार करत राहुल गांधी यांनी कोर्टात हजर होऊन स्वतःची बाजू मांडावी, असे निर्देश कोर्टाने दिले.