
मनपाच्या सुरक्षा दलाचा ५९ वा वर्धापन दिन साजरा
मुंबई : मुंबई पालिकेच्या यांत्रिकी आणि विद्युत विभागामार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्थात ए आय कॅमेरा (AI camera) हे पथदर्शी प्रकल्प अंतर्गत मुंबई पालिकेच्या प्रमुख चार रूग्णालयात कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. तसेच प्रसुतिगृह आणि उपनगरीय रूग्णालये याठिकाणीदेखील कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रसुतिगृह आणि रूग्णालय या परिसरात येणाऱ्या व्यक्तींच्या चेहर्याची ओळख संबंधिचा तपशील तसेच परिसरात ये - जा करणार्या वाहनांची माहितीही मिळवणे शक्य होईल. पुढील टप्प्यात विभाग कार्यालये (वॉर्ड) अणि महानगरपालिकेच्या नाट्यगृह व जलतरण तलाव याठिकाणीदेखील अशाच प्रकारचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, असल्याची माहिती प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी दिली.
मुंबई पालिकेच्या सुरक्षा दलाचा ५९ वा वर्धापन दिन शनिवारी १ मार्च २०२५ भांडुप संकुल स्थित सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांच्यासह विविध अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

आरोपपत्रात खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्येचा एकत्रित उल्लेख बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) वाल्मिक कराड (Valmik Karad) हाच मुख्य ...
मुंबई पालिकेच्या आस्थापनांना सेवा देण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम सुरक्षा दल चोखपणे बजावत आहे. सुरक्षेसारखी अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडणारे सुरक्षा दल अधिक अद्ययावत अणि बळकट करण्याकरिता तसेच सुरक्षा खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्याकरिता पालिका प्रशासन प्रयत्नशील राहील,अशी ग्वाही मुंबई पालिकेच्या उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांनी दिली.
सुरक्षा दलातील अधिकारी, कर्मचारी हे मुंबई महानगरपालिकेच्या सेवेस कायम तत्पर असतात. विविध बंदोबस्त त्यांनी उत्तम प्रकारे आणि कार्यक्षमतेने पार पाडले आहेत. सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांकरिता ई- मस्टर प्रणालीही लवकरच कार्यान्वित होणार आहे, असे चंदा जाधव यांनी नमुद केले.