CM Devendra Fadnvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २ मार्चला 'परिवहन भवना'चे भुमिपुजन

मुंबई : परिवहन विभागाचे (RTO ) मुख्यालय असलेल्या "परिवहन भवन" या नव्या इमारतीचे भूमिपूजन २ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.




रस्ते वाहतुकीची नियमन करण्यासाठी १ मार्च १९४० ला तत्कालीन मुंबई राज्याचा परिवहन विभाग अस्तित्वात आला. त्यामुळे १ मार्च हा दिवस "परिवहन दिन" म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची औचित्य साधून या रविवारी सर पोचखानवाला मार्ग वरळी, मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते ४ मजली प्रशस्त अशा "परिवहन भवन" या इमारतीचे भूमिपूजन संपन्न होत आहे. सुमारे १२८०० चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीमध्ये एकावेळी १५० चारचाकी वाहने उभी करता येतील, इतकी चार मजल्याची भूमिगत पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. हि इमारत पुढील अडीच वर्षांत बांधून पूर्ण केली जाणार आहे.

विशेष म्हणजे राज्याला दरवर्षी १५ हजार कोटी रुपये महसूल मिळवून देणाऱ्या या विभागाच्या मुख्यालयाला स्वतः ची इमारत नव्हती. परिवहन विभाग स्थापन झाल्यापासून तब्बल गेली ८५ वर्ष या विभागाचे मुख्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये होते. परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन विभागाच्या पहिल्या बैठकीमध्ये परिवहन विभागाच्या मुख्यालयाची स्वतःची इमारत बांधण्याचा संकल्प सोडला. एवढंच नाही तर त्यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते "परिवहन भवन" या परिवहन विभागाच्या मुख्यालयाचे येत्या रविवारी भुमिपुजन होत आहे.

Comments
Add Comment

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका

'जैन समाजाची सेवा, त्याग, अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी'

मुंबई : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी

मुंबई मनपातील संभाव्य घोटाळ्यांवर भाजपचा प्रहार

मुंबई : महापालिकेत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांसोबत संगनमत करून कामे मिळवण्यासाठी घातलेला घाट आणि

मुंबई मनपा मुख्यालयासह कार्यालये, रुग्णालयांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई : महापालिका मुख्यालयासह इतर इमारतींमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आता अत्याधुनिक स्वरुपाच्या डोअर

भेंडीबाजारात पुन्हा फेरीवाल्यांवर होणार कारवाई

मुंबई : महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत