…तर भारत-अफगाणिस्तान यांच्यात रंगेल सेमीफायनल!

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये अफगाणिस्तानच्या संघाने इंग्लंडला हरवत मोठा उलटफेर केला. या मुळे इंग्लंडच्या संघाला सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर जावे लागले. तर अफगाणिस्तानने सेमीफायनलमधील आपली दावेदारी कायम ठेवली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज अफगाणिस्तानचा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यावर चाहत्यांचे लक्ष आहे.



अफगाणिस्तानशी होणार भारताचा मुकाबला?


शुक्रवारी जर अफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील. अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेत आहे. अशातच जर त्यांनी सेमीफायनलमध्ये एंट्री केली तर त्यांच्यासाठी हा मोठा क्षण असेल. तसेच सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानची टक्कर भारताशी होऊ शकते. कसे ते जाणून घ्या...


जर अफगाणिस्तानचा संघ आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर राहतो . तसेच भारत आपल्या ग्रुपमध्ये टॉपवर असेल तर दोघांमद्ये सेमीफायनलचा सामना रंगू शकतो. जर भारतीय संघ आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर असेल आणि अफगाणिस्तानचा संघ ग्रुपमध्ये पहिल्या स्थानावर असेल तर दोघांमध्ये सेमीफायनलचा सामना रंगेल.

Comments
Add Comment

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ