ठाणे : पक्षाघाताचा झटका आल्यावर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. या संकटातून आता बरे होणार नाही अशी भावना असली, तरी वेळेवर औषधोपचार आणि फिजिओथेरपी करणे खूप महत्वाचे ठरत आहे. ठाणे सिव्हील रुग्णालयात चेहऱ्याचा पक्षघाताने (बेल्स पाल्सी) त्रस्त झालेल्या पाच रुग्णांवर चांगले उपचार आणि फिजिओथेरपीद्वारे योग्य ट्रीटमेंट देऊन चेहऱ्यावर पूर्वीसारखे हसू उमटले आहे. आता कधी कोणाला कोणता आजार जडेल याचा नेम नाही. त्यामुळे एखाद्या रोगाची लक्षणे दिसल्यावर तात्काळ उपचार करणे हेच महत्वाचे ठेरत असून, सध्या चेहऱ्याचा पक्षाघात (बेल्स पाल्सी) झालेले अनेक रुग्ण बघायला मिळत आहेत. मुळात पक्षाघात झाल्यावर पुढे आपले कसे होणार ही चिंता सतावते. आपण दुसऱ्यावर अवलंबून रहाणार या विवंचनेत असणाऱ्या रुग्णांसाठी ठाणे सिव्हील रुग्णालय आशेचे किरण ठरत आहे. गेल्या दोन महिन्यात चेहऱ्याचा पक्षाघत (बेल्स पाल्सी) झालेल्या पाच रुग्णांवर जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. धिरज माहंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार झाले असल्याची माहिती फिजिओथेरपीस्ट डॉ. ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली.
विषाणू संसर्ग, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती मधुमेह व रक्तदाब, आपघातामुळे आदी कारणांनी बेल्स पाल्सी कोणत्याही वयोगटातील स्त्री व पुरुषानां होऊ शकतो. चेहऱ्याच्या मज्जातंतूचा (फेशिअल नव्ह ) मेंदूमधून निघून कानाच्या मागुन आपल्या चेहऱ्याला पाच भागात विभागुन चेहऱ्याचे हावभाव , डोळे व तोंडाच्या हालचाली नियंत्रणात ठेवते . बेल्स पाल्सी आजारात चेहऱ्याच्या मज्जातंतूंला होणाऱ्या सुजेमुळे चेहऱ्याचा लकवा होत असल्याचे ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. सुरभी लुटे म्हणाल्या.
कोट
एखाद्याला चेहऱ्याचा पक्षघात (बेल्स पाल्सी) झाला तरी घाबरून जायचे कारण नाही वैद्यकीय उपचार व फिजिओथेरपीने साधारणपणे एक ते तीन महिन्यात कमी अधिक कालावधीत बरा होतो. रुग्णालयात च इलेक्ट्रीकल स्टिम्युलेशन देवून स्नायूंचे आकुंचन घडवून आणले जाते. सोबत घरी कपाळावर आठ्या पाडणे, डोळ्यांची उघड झाप करणे, गालाचा फुगा करणे, मेणबत्ती विझवणे, शिट्टी वाजवणे आदींनी उपचारांनी रुग्ण पूर्णपणे बरा होतो.
– डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हील रुग्णालय ठाणे)
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…