Saturday, October 25, 2025
Happy Diwali

पाकिस्तानमध्ये मशिदीत स्फोट; पाच ठार, अनेक जखमी

पाकिस्तानमध्ये मशिदीत स्फोट; पाच ठार, अनेक जखमी
अखोरा खट्टक : पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अखोरा खट्टक भागात शुक्रवारचा नमाज सुरू असताना मशिदीत स्फोट झाला. या स्फोटामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले. मशिदीतील मुख्य सभागृहात स्फोट झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.
प्राथमिक माहितीनुसार आत्मघाती हल्ला करुन मशिदीत स्फोट करण्यात आला. या स्फोटात मौलाना हामिद उल हक हक्कानीचा मृत्यू झाला. हक्कानीया समुहाच्या मशिदी आणि मदरशांचा प्रमुख तसेच भारत विरोधी गटाचा एक महत्त्वाच्या नेता अशी मौलाना हामिद उल हक हक्कानीची ओळख होती. याआधी सॅम्युअल हकची घरातच हत्या करण्यात आली होती. पाठोपाठ त्याचा मुलगा हामिद उल हक हक्कानी हा पण स्फोटात ठार झाला आहे.
सॅम्युअल हक हा पाकिस्तानमधील तालिबानचा संस्थापक म्हणून ओळखला जात होता. यामुळे आधी त्याची आणि आता त्याच्या मुलाची हत्या झाल्याने हक्कानी समुहाच्या पाकिस्तानमधील वर्चस्वापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खैबर पख्तूनख्वाचे पोलिस महानिरीक्षक (आयजी) झुल्फिकार हमीद यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. स्फोट प्रकरणी तपास सुरू आहे. सर्व शक्यता आजमावल्या जातील, असे आयजी झुल्फिकार हमीद म्हणाले.
Comments
Add Comment