अलिबाग : अलिबागच्या समुद्रात मच्छीमारांच्या बोटीला आग लागली आहे. ही दुर्घटना आज (शुक्रवार २८ फेब्रुवारी २०२५) सकाळी दहाच्या सुमारास घडली.
Eknath Shinde : इडीची पिडा पाठी लागलेल्या अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्री संतापले!
मिळालेल्या माहितीनुसार साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मासेमारीच्या बोटीला आग लागली. बोटीत २० जण होते. त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. आग लागल्यामुळे बोट ८० टक्के जळून खाक झाली.
बोटीच्या वरील जाळी देखील जळाली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणून आग विझविण्याचे काम सुरू आहे.