Badrinath Glacier Collapses : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळडा! ५७ जण अडकले

Share

देहराडून : उत्तराखंडमधील चमोली येथील माना गावात आज शुक्रवारी हिमकडा तुटल्याने मोठा अपघात (Badrinath Glacier Collapses) झाला आहे. या घटनेत ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले होते, मात्र यातील १६ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अजूनही ४१ कामगार बर्फाखाली दबलेले आहेत. या ४१ जणांचा शोध सुरू आहे. अपघातानंतर प्रशासन आणि बीआरओ टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. सध्या आयटीबीपी आणि गढवाल स्काउटची टीम बचाव कार्यात व्यस्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी एका खाजगी कंत्राटदाराचे कामगार मोठ्या संख्येने घटनास्थळी काम करत होते. हे सर्वजण बीआरओच्या कराराखाली काम करणाऱ्या कंत्राटदाराचे कामगार होते. जेव्हा हिमस्खलन झाले तेव्हा सर्वजण इकडे तिकडे धावू लागले. त्यापैकी काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र ५७ कामगार बर्फाखाली अडकले होते. यातील १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि बीआरओ टीमने घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद सुमन यांनी सांगितले की, चमोली बद्रीनाथ धाममधील माना गावाजवळील एक हिमकडा कोसळल्यामुळे ५७ कामगार अडकले आहे. तर १६ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. उर्वरित ४१ कामगारांचा शोध सुरू आहे. दरम्यान, चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी म्हणाले की, दळणवळण व्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत असल्याने योग्य माहिती मिळत नाही.

चमोलीच्या वरच्या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने आजसाठी (दि. २८) आधीच ऑरेंज अलर्ट जारी केला होता. ३२०० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागातही बर्फवृष्टीची शक्यता होती. हिमस्खलनाची भीतीही व्यक्त करण्यात आली. आता बद्रीनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महामार्गाजवळ हिमकडा कोसळला आहे. उत्तराखंडमधील माना गाव भारत आणि चीनच्या सीमेवर आहे. येथे एक आर्मी बेस कॅम्प आहे. म्हणून, सैन्य प्रथम बचाव कार्यात गुंतलं आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके रवाना करण्यात आली आहेत. हिमकडा कोसळल्यामुळे बीआरओ पथकांनी बचावकार्यही सुरू केलं आहे.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

12 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

50 minutes ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

4 hours ago