AI Robot : चीनमध्ये एआय रोबोट नियंत्रणाबाहेर, लोकांवर केला हल्ला

बीजींग : चीनमधून एक अतिशय आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, एआय नियंत्रित असलेल्या रोबोटने अचानक लोकांवर हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोबोटने हल्ला केल्यावर तिथे उपस्थित असलेले लोक घाबरले.


या व्हायरल व्हिडिओमध्ये, ह्युमनॉइड रोबोट गर्दीकडे जात आहे आणि काही लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेमुळे तिथे गोंधळ निर्माण होतो. तथापि, सुरक्षा कर्मचारी वेळेत रोबोट नियंत्रित करतात. सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे रोबोटने असे वर्तन केले. दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.



चीनमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एआय तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्याच्या संभाव्य धोक्यांबद्दल एक नवीन वादविवाद सुरू झाला आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना आणखी मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये दक्षिण कोरियामध्ये घडलेली घटना आपण कशी विसरू शकतो जिथे एका रोबोटने कामावर असताना पायऱ्यांवरून उडी मारून आत्महत्या केली होती.


अलिकडेच क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधक डेबोरा ब्राउन आणि पीटर अॅलर्टन यांनी एआयच्या नकारात्मक परिणामांबद्दल सांगून जगभरातील लोकांमध्ये चिंता निर्माण केली आहे. AI robot in China या अभ्यासात असे म्हटले आहे की एआय आपली बौद्धिक क्षमता कमी करत आहे म्हणजेच आपल्याला 'मूर्ख' बनवत आहे.

Comments
Add Comment

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

थायलंड  : बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई  : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो  : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक अनुभवाची संधी! युनेस्कोचा इंटर्नशिप प्रोग्राम, आताच करा अर्ज

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. युनेस्कोने

भारतानंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तानचे पाणी अडवणार!

काबूल : भारतानंतर आता तालिबानशासित अफगाणिस्तान पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा मर्यादित करण्याची आणि नदीवर धरणे

रशियातील महत्त्वाच्या दोन तेल कंपन्यांवर ट्रम्पचे निर्बंध, रशियावर येणार आर्थिक दबाव! भारतालाही बसणार का फटका?

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर आर्थिक दबाव आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.