पुणे : पुणे स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (३७) याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दोन दिवसांपासून फरार होता. त्याच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी तब्बल १३ विशेष पथके तयार केली होती. अखेर गुरुवारी रात्री उशिरा शिरूर तालुक्यातील एका गावातून त्याला अटक करण्यात आली.
आज (शुक्रवार) आरोपीला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीचे वकिलपत्र वाजिद खान बिडकर यांनी घेतले. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, आरोपीचा गुन्हेगारी इतिहास आहे. यापूर्वीही त्याच्यावर चोरी, दरोडा आणि चेन स्नॅचिंगसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पीडितेवर दोन वेळा अत्याचार केला. मित्राच्या सांगण्यावरून पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली.
स्वारगेट एसटी डेपोमध्ये नेमके काय घडले ?
स्वारगेट एसटी डेपोमध्ये एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या आणि सर्व दिवे बंद असलेल्या रिकाम्या शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली. एका तरुणीला दिशाभूल करणारी माहिती देऊन बसमध्ये पाठवण्यात आले. ही तरुणी बसमध्ये शिरताच वेगाने आरोपी बसमध्ये आला, त्याने बसचा दरवाजा आतून बंद केला आणि तरुणीवर बलात्कार केला. आरोपीने पीडितेवर दोनदा अत्याचार केला. पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. कायम गर्दी असलेल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये ही घटना घडली त्यावेळी कोणाच्याही लक्षात आले नाही. घटनेनंतर आधी आरोपी बसमधून उतरला आणि वेगाने पसार झाला. थोड्या वेळाने पीडित तरुणी खाली आली आणि दुसऱ्या बसमधून पुढच्या प्रवासाला रवाना झाली. प्रवासादरम्यान पीडितेने एका मित्राला फोन करुन घटनेची माहिती दिली. या मित्राने दिलेला सल्ला पटला म्हणून तरुणी हडपसर जवळ बसमधून उतरली आणि दुसऱ्या वाहनाने पुन्हा स्वारगेट येथे आली. स्वारगेट पोलिसांकडे तरुणीने बलात्कार प्रकरणी तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेले.
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…
सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…
मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…
काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…