Navi Mumbai Airport : नवी मुंबईकरांसाठी गुडन्यूज! विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर

  239

नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai Airport) काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच हे विमानतळ प्रवाशांसाठी सज्ज होणार आहे. सोमवारी संयुक्त पथकाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली असून विमानतळ उद्घाटनाची तारीख देखील जारी केली आहे.



DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "मूल्यांकनादरम्यान, आम्हाला विमानतळ ऑपरेटरने कळवले की ते ५ मार्चपर्यंत सर्व आवश्यक असणारी परवानगी मिळविण्यासाठी अर्ज करतील". या सर्व तपासणीनंतर, आता विमानतळ ऑपरेटर नियमांनुसार विमानतळ परवान्यासाठी DGCA कडे अर्ज करतील. हे अर्ज १५ मे पासून सुरू होणाऱ्या फ्लाइट ऑपरेशनसाठी असणार आहे. त्यानंतर १५ मे पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा प्रवाशांसाठी सुरु होणार आहे.


दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरु होणार असल्यामुळे नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यावर अनेक रिक्षा चालकांना रोजगाराची सुविधादेखील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Navi Mumbai Airport)



काय आहेत वैशिष्टये?


नवी मुंबई विमानसेवा कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी हाताळेल अशी अपेक्षा आहे. सध्या ३.७ किमी धावपट्टी ऑपरेशनसाठी तयार आहे, लवकरच दुसरी धावपट्टी बांधण्याची योजना आहे. त्याचबरोबर भूमिगत मेट्रो द्रुतगती मार्ग, अटल सेतू पूल, बुलेट ट्रेन सेवा या बहुविध वाहतूक पर्यायांमुळे विमानतळ प्रवेशयोग्य होईल आणि प्रवाशांचा प्रवास वेळ देखील कमी होणार आहे.

Comments
Add Comment

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.