Champions Trophy: सेमीफायनलपासून एक पाऊल दूर अफगाणिस्तानचा संघ

मुंबई: वनडे वर्ल्डकप २०२३नंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आपला जलवा दाखवण्यास सुरूवात केली आहे. यावेळेस अफगाणिस्तानच्या संघाने ही धमाल आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये केली आहे. त्यांनी मोठा उलटफेर करताना सेमीफायनलमध्ये आपली दावेदारी सिद्ध केली आहे.


खरंतर, यावेळेस आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवला जात आहे. ग्रुप एमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघाने सेमीफायनलमध्ये एंट्री घेतली आहे. तर ग्रुप बीमध्ये समीकरण रंजक झाले आहे. जर ऑस्ट्रेलियाचा संघ सतर्क झाला नाही तर ते बाहेर होऊ शकतात.



अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवत केले बाहेर


ग्रुप बी मध्ये रोमहर्षक सामना बुधवारी खेळवण्यात आला. या सामन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मधील मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कमकुवत समजला जाणाऱ्या अफगाणिस्तानी संघाने इंग्लंडला ८ धावांनी हरवले. या पराभवासह जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. तर अफगाणिस्तानचा संघ अद्याप सेमीफायनलच्या शर्यतीत आहे. त्यांचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना २८ फेब्रुवारीला होत आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर