पुणे : चंदननगर येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीचे तातडीचे काम करण्यात येणार असल्याने शुक्रवारी खराडी, चंदननगर व वडगाव शेरी तसेच लष्कर जलकेंद्रावर अवलंबून असलेल्या परिसरात पाणी पुरवठा बंद (Water Supply) असणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. (Pune News)
Bank Holiday : मार्च महिन्यात ‘इतके’ दिवस असणार बँकांना टाळे! पाहा यादी
कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?
चंदननगर येथील टाकीच्या मुख्य जलवाहिनीचे तातडीचे व अत्यावश्यक स्वरुपाचे दुरुस्तीचे काम शुक्रवारी पाणी पुरवठा विभागाकडून केले जाणार आहे. त्यामुळे खराडी, चंदननगर, वडगाव शेरीमधील आनंद पार्क, सुनीता नगर, गणेश नगर, स्वामी समर्थ, नामदेव नगर, मते नगर, पुण्य नगरी, महावीर नगर, मुन्नवार सोसायटी, माळवाडी परिसर तसेच लष्कर जलकेंद्रावर अवलंबुन असलेल्या परिसराचा पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद असणार आहे. शनिवारी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. (Pune News)