मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मधील सातवा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रावळपिंडी येथे खेळवला जाणार होता. मात्र खराब हवामान आणि सातत्याने पावसामुळे सामना रद्द घोषित करण्यात आला. हवामान इतके खराब होते की दोन्ही संघाचे कर्णधार टॉरससाठीही बाहेर पडू शकले नाहीत. हा सामना महामुकाबल्यासारखा होईल अशी अपेक्षा होती मात्र दोन्ही संघांना खराब हवामानाचा फटका सहन करावा लागला. सामना रद्द झाल्याने ग्रुप बीमधील दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला आहे.
महत्त्वाचा होता ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना
हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सेमीफायनलच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. यात जिंकणाऱ्या संघाचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित होणार होणते मात्र हा सामना रद्द झाल्याने इंग्लंड आणि अफगाणिस्तानसाठी ही चांगली बाब आहे. कारण त्या दोघांना अद्यापही सेमीफायनलचे दरवाजे खुले आहेत.
द.आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सध्या ग्रुप बीमध्ये तीन तीन गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानसोबत सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकत कांगारूंचा संघ सरळ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. तर इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव झाल्यास ते स्पर्धेतून बाहेर जातील.
जर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला. तसेच इंग्लंडच्या संघाने अफगाणिस्तानवर विजय मिळवला तर ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला काही करून हरवावे अशी प्रार्थना करावी लागेल.