मुंबई : ‘झी मराठी’ वर काही दिवसांपूर्वी एक टिझर रिलीझ झाला, आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. चर्चा सुरु झाली हा कार्यक्रम नक्की काय आहे, रिऍलिटी शो आहे की नवी मालिका आहे. तर हा एक असा शो आहे जो बदलेल मराठी टेलिव्हिजनवर रिॲलिटी शोची परिभाषा, लवकरच तुमची लाडकी झी मराठी वाहिनी घेऊन येत आहे
‘चल भावा सिटीत’. हा शो ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतील स्पर्धकांना एकत्र आणणार आहे. या स्पर्धकांना अश्या आव्हानांना सामोरे जावे लागेल जिथे त्यांना आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यास प्रवृत्त करेल. ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील, आणि त्यांना आव्हान देतील. चल भावा सिटीत हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती दर्शवेल.
सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईलच. अशी एक अफलातून संकल्पना जिचा प्रेक्षकांनी विचार सुद्धा केला नसेल आता तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या लाडक्या झी मराठीवर. चल भावा सिटीत शो बदलणार मराठी टेलिव्हिजनवर रिॲलिटी शोची परिभाषा.
जसा प्रोमो गाजतोय तसं ह्या नव्याकोऱ्या शोचा सूत्रधार कोण असणार ह्याची सुद्धा उत्सुकता वाढताना दिसत आहे. तेव्हा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाचे रंग उधळणारा ‘चल भाव सिटीत’ लवकरच आपल्या झी मराठीवर येत आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…